Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; स्पष्टीकरण देत म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे (Eknath Shinde) महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेसोबत असलेले आमदार बंडावर कायम आहेत. त्यांनी आपल्यावतीने कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना दिला आहे. यामुळे शिंदेंची हिंमत वाढली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. अशात एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य आले आहे. त्यांच्या वक्तव्याने बंडखोर आमदारांची चिंता वाढू शकते. (Eknath Shinde reversed his statement)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंड पुकारलेल्या आमदारांशी संवाद साधताना ‘एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे’ असे म्हणाले होते. काहीही झाले तरी आम्ही जिंकू. सर्व सुख आणि दुख आपलेच आहे, असेही म्हणाले होते. मी एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे असे म्हटले तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शक्ती असे म्हणायचे होते, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हणाले. यामुळे शिंदे हे आपल्या पूर्वीच्या विधानावरून पलटल्याचे दिसते.

आम्ही घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. तुमच्याकडे आमची सर्व शक्ती आहे. तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही निराश करणार नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तेव्हा ती दिली जाईल, असेही आश्वासन पक्षाने दिल्याचे एकनाथ शिंदे आमदारांना (MLA) सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये (video) दिसले. मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही.

हा व्हिडिओ आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी देशातील राष्ट्रीय पक्षांची नावे वाचली. त्याचबरोबर यामागे भाजपशिवाय कोणते घटक असू शकतात, हेही सांगितले. बहुमत विधानसभेत सिद्ध केले जाईल. गुवाहाटीत बसून नाही, असेही शरद पवार म्हणाले होते.

बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात कार्यकर्त्यांचा रोष उफाळून येत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कुर्ला येथील बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: सटाणा-साक्री-शिर्डी महामार्गाचे काम रखडले; राष्ट्रवादीचे नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन, गुरुवारपासून काम सुरू होणार

Hasan Mushrif vs Satej Patil गोकुळच्या न्यायालयीन खर्चावरून सतेज पाटलांच्या टीकेवर हसन मुश्रीफांनी केले वक्तव्य

Pune Crime: पहाटे पोलिसांची घरांवर धडक; बारामतीत १३५ आरोपी जेरबंद, ६५ पकड वॉरंटमधील तर ७० फरार

FDA Action Against NSCI Club: मुंबईतील NSCI क्लबच्या किचनमध्ये माशा, झुरळांचा सुळसुळाट; FDAकडून खाद्य परवाना निलंबित

Latest Marathi News Update : २६ नोव्हेंबरला नागपुरात CJPची भव्य रॅली - अभिजित दिपके

SCROLL FOR NEXT