Dilip Walse Patil  sakal
महाराष्ट्र बातम्या

Security : शिंदेंना झेड सुरक्षा दिली होती; वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या असेही वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. श्रीकांत शिंदेंच्या पत्रानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या असे ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गटाकडून करण्यात येणारे आरोप खोटे असल्याचे वळसे पाटलांनी म्हटले आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या असेही वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाचे आरोप काय?

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, दादा भुसे आणि दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरीटी नाकारली होती, असा आरोप भुसे, कांदे आणि केसरकर यांनी केला. यावरून आता राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदे नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांच्या काळात अनेक नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई झाली होती. त्यात अनेक नक्षलवादी मारले गेले होते. त्यामुळे त्यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना झेड सुरक्षा देण्याचं टाळलं होतं, असंही शिंदे गटाने म्हटलं होते. त्यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

राजकारणासाठी निर्णय रद्द करणे दुर्देंवी

दरम्यान, राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारने अनेक कामांना दिलेल्या मंजुरींना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे, अशा प्रकारचा निर्णय घेणे दुर्देवी असल्याचे वळसे पाटील म्हणाले. असे करून राजकारण होईल. मात्र, यामुळे याचा परिणाम थेट सामान्या नागरिकांवर होईल. त्यामुळे राजकारणासाठी कामांवर स्थगितीचा निर्णय घेणे उचित नाही.

राज्यातील काही प्रकरणांचा तपास राज्य पोलिसांकडून काढून सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला असून, त्याचा तपास कुणीही करावा मात्र, तो योग्य पद्धतीने व्हावा हीच अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT