deepak kesarkar political news Sakal
महाराष्ट्र बातम्या

आजही हातात शिवबंधन; आम्हीच शिवसैनिक - केसरकर

एकनाथ शिंदेंना काल शिवसेनेच्या नेतेपदावरून काढून टाकण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले ५० आमदार सध्या गोव्यामध्ये आहेत. हे आमदार उद्या मुंबईत येणार आहेत. त्याआधी या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. एकनाथ शिंदेंवर शिवसेनेने केलेल्या कारवाईवर त्यांनी उत्तर दिलं आहे. (Shivsena News)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता राज्याचे प्रमुख आहेत, याची आठवण केसरकर (Deepak Kesarkar) यांनी करुन दिली. तसंच एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन काढून टाकणार शिवसेनेने (Shivsena) जाहीर केलेलं पत्र हे आक्षेपार्ह आहे. त्याला आव्हान दिलं जाईल, असंही केसरकरांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंवर शिवसेनेने केलेल्या कारवाईच्या विरोधात कायदेशीर पाऊल आपण उचलणार असून शिवसेनेला रितसर उत्तर पाठवणार आहोत. अशा तऱ्हेची कृत्ये लोकशाहीसाठी शोभादायक नाही.

शिवसेनेवर टीका

शिवसेनेकडून कार्यकर्त्यांचं प्रतिज्ञापत्र तयार करुन घेतलं जात असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, अनेक कार्यकर्त्यांकडून अँफिडेव्हिट करण्याची मोहिम चाललीये. पण तशी पद्धत नाही, हे कोणतंही बंधन नाही, प्रेमाचं बंधन लागतं. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे. बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) निशाणी म्हणून आम्ही ते बांधलं आहे. अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र तयार करणं हे दिशाभूल करण्याचं काम आहे. कार्यकर्त्यावर गैरविश्वास दाखवणं हे चुकीचं आहे. अॅफिडेव्हिट केल्यानं बंधन येत नाही, शिवबंधन हे नातं अजूनही कायम आहे आणि ते अबाधित राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT