Crime News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या का झाली? पोलिसांनी लावला छडा

पैशांच्या वादातून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न; क्राईम ब्रँच आणि विठ्ठलवाडी डिटेक्शन ब्रँचची कारवाई

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शाखाप्रमुख शब्बीर शेख यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात मध्यरात्री ही हत्या झाली. पाच ते सहा जणांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उल्हासनगरमधील शिंदे यांच्या गटातील शाखाप्रमुख शब्बीर शेख या जुगार क्लब चालकाची हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील जय जनता कॉलनीत जुगाराचा अड्डा चालवणारा शब्बीर शेख याची २६ मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. तर त्याच्या भावावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर उल्हासनगर परिमंडळ ४ मधील ८ पोलीस स्टेशन आणि ठाणे गुन्हे शाखा यांच्याकडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरू होता.

ही हत्या विक्रम कवठणकर, दिनेश कवठणकर, जयेश साळुंखे, विजय रुपानी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं. यानंतर ठाणे गुन्हे शाखेने यापैकी दिनेश कवठणकर याला बेड्या ठोकल्या. तर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी विक्रम कवठणकर, प्रशांत तायडे आणि बोराळे या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

त्यांच्याकडे चौकशी केली असता जुगार चालक शब्बीर शेख यांच्यासोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आपले यापूर्वी वाद झाले होते आणि त्याच वादातून आपण ही हत्या केल्याची कबुली या सर्वांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर काही आरोपी अजूनही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे.

उल्हासनगरात शिवसेना शाखाप्रमुखाची निर्घृण हत्या,संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद...

या घटनेचे सीसीटीव्ही व्हायरल झाले असून जय जनता कॉलनी येथे एका जुगाराच्या क्लब बाहेर ही हत्या झाली आहे. शब्बीर शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो शिवसेना शाखाप्रमुख होता.तर शब्बीर शेख जुगाराचा क्लब चालवत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT