Eknath Shinde takes oath as the Chief Minister of Maharashtra  
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मागील १० दिवसांपासून सुरू असलेला राजकीय गोंधळ अखेर संपला आहे, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येते शिवसैनिकांच्या उपस्थितीत शपथ घेतली. काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. पहिल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. (Eknath Shinde takes oath as the Chief Minister of Maharashtra)

यादरम्यान उपमुख्यमंत्री पदी भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होणार नाही माझा सरकरला बाहेरून पाठिंबा देईल असे सांगितले होते. मात्र केंद्रीय नेत्यांकडून फडणवीसांनी सरकरमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं असं सांगितल्यानंतर अखेर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी अशी इच्छा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. त्यानुसार आता फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे फडणवीसांनी मोठे मन दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगत आपण बाहेर राहून सरकारला साथ देणार असल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT