Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

लग्न सोहळे अंगाशी? महाविकास आघाडीतील 13वे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

ओमकार वाबळे

महाविकास आघाडी सरकारमधील 13 वे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. याआधी 10 मंत्री आणि जवळपास 22 आमदारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धीरज देशमुख यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला. आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Eknath Shinde corona positive)

कोरोनानंतर (Covid19) आता ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निर्बंध लावले जात आहेत. लग्न सोहळे, राजकीय सभा आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गामुळे राज्य सरकारने नुकतेच कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र मागच्या काळात झालेल्या राजकीय मंडळींच्या लग्न सोहळ्यांमध्ये अनेकजण कोरोनाबाधित झाले आहेत.

सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबतच आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील 22 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

आधी पॉझिटिव्ह...मग निगेटिव्ह..आता पुन्हा पॉझिटिव्ह

एकनाथ शिंदे यांचा एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि त्यानंतर एक रिपोर्ट निगेटिव्ह आहे. यासाठी त्यांनी काल रात्री पुन्हा टेस्ट केली. यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Rahul Gandhi: ''राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस देणार'', संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू स्पष्टच बोलले

Pune Trade : आरबीएसएममध्ये ५७ एमओयूवर सह्या; ३१ कोटी रुपये व्यवहारांची नोंद, रॅम्प उपक्रमांतर्गत रिव्हर्स बायर-सेलर मिटला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

Latest Marathi News Live Update : उत्सवांच्या काळात अशांत घटकांशी कठोरपणे वागण्याचे निर्देश: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT