Eknath shinde latest political News
Eknath shinde latest political News 
महाराष्ट्र

SC च्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेचं ट्वीट म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : महाराष्ट्रातील सत्तांतराचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला असून, न्यायालयाने शिवसेनेतील बंडखोर 16 आमदारांना मोठा दिलासा दिला आहे. बंडखोर आमदारांवर 12 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई न करण्याचे आदेश सर्वेच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणावरील पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्वीट केले आहे. (Eknath Shinde Latest News In Marathi)

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, न्यायालयाचा आजचा निकाल हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! असल्याच्या भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. (Maharashtra Politics Latest News In Marathi)

कोर्टाच्या निर्णयावर राऊतांचं तीन शब्दांत उत्तर; म्हणाले...

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. तसेच या नोटीशीला पाच दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. तर, नोटीस बजावलेल्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. या सर्वामध्ये न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना केवळ ही कायदेशीर लढाई आहे ती चालत राहिल असे मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे.

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीकडे सर्वांचे लक्ष

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील पुढील सुनावणी या सर्व घडामोडींमध्ये आज संध्याकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून, या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार की एखादा महत्त्वाचा निर्णयाची घोषणा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे गुवाहाटी येथे गेलेल्या एकनाथ शिंदेंच्या गटाचीदेखील बैठक सुरू झाली असून, या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो तसेच या पुढील लढाईची रणनीती नेमकी कशी असेल यावर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT