Eknath Shinde and Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

"...अन्यथा निलंबनास तयार राहा"; वकिलांनी सांगितला फॉर्म्युला

विलिनीकरण केले नाही तर आमदारांचे निलंबन अटळ आहे असं वकिलांनी सांगितलं आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेच्या वतीने जेष्ठ वकील आणि नेते अरविंद सावंत यांनी बंडखोर आमदारांबाबत शिवसेना करत असलेल्या आरोपाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे. आम्ही जे काय बोलतो त्याला कायद्याचा किती आधार आहे हे तुम्हाला कळेल असं ते यावेळी म्हणाले आहेत. यावेळी सुप्रीम कोर्टाचे वकील कामत यांनी आमदारांवरील कारवाईसाठी लागू असलेले नियम सांगितले.

(Shivsena Arvind Sawant News)

शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांवर कारवाईच्या नोटीसा दिल्या आहेत. आता राजकीय नव्हे कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्यासंदर्भात नियम आणि कायदे काय आहेत त्यावर सुप्रीम कोर्टाचे वकील सांगणार आहेत असं शिवसेनेचे नेते अरविंद सावंत म्हणाले आहेत.

"बंडखोरांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. बंड केलेल्या गटाने त्यांचा गट एखाद्या पक्षात विलीन केला तरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही. त्यांनी विलीनीकरण केलं नाही तर बहुमत असतानाही अपात्रतेची कारवाई होते." असं वकील कामत म्हणाले. दरम्यान यांच्या अपात्रतेचे सर्व अधिकार विधानसभा उपाध्यक्षांकडे आहेत असंही ते म्हणाले आहेत.

"अविश्वास ठरावाचं पत्र एका कुरिअर मार्फत आलं आहे. दरम्यान शिवसेनेने बोलावलेल्या बैठकीत ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आणि अजून काही कारणांमुळे आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. ही कारवाई होऊ द्यायची नसेल तर विलिनीकरण करावे लागेल. या अपात्रतेच्या कारवाईवर उद्या सुनावणी होणार आहे." असं वकिलांनी सांगितलं आहे.

"विधानसभा उपाध्यक्ष्यांच्या अविश्वासाचा प्रस्ताव आमदारांच्या अधिकृत इमेलवरून आला नाही, अनोळखी इमेलवरून आला असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता आमदारांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जा असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदार आणि गटाला या कायदेशीर कारवाईला तोंड द्यावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT