Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री; फडणवीसांचा मास्ट्ररस्ट्रोक

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, असे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सांगत होते

निनाद कुलकर्णी

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील अशी चर्चा असतानाच यामध्ये आता मोठा ट्वीस्ट आला आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज फक्त एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले. त्यावेळी आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले होते. (Ekanath Shinde Take Oath As Chief Minister Of Maharashtra)

फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, असे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सांगत होते, पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे ऐकले नाही. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला अशा लोकांना घेऊन सरकार स्थापन केले. या अडीच वर्षाच्या काळात प्रगती झाली नाही. मविआसोबत जाण्याच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारवर शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरेंवर नाराज होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. (Eknath Shinde News)

राज्यात 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीकडे बघून मतदान केले होते. मात्र, निकाल लागल्यानंतर शिवसेनेनं विचार बदलला. या निवडणुकीत शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर, भाजपा-शिवसेना युतीने 161 जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये अपक्षांची संख्या एकत्र करून 170 संख्याबळ होत होते. या मोठ्या विजयानंतर राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन होईल अशी आशा होती. मात्र, निकालाचे आकडे बघितल्यानंतर शिवसेनेनं विचार बदललल्याचे फडणवीस म्हणाले. एवढेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांच्या उपस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री होईल असे जाहीर केले होते. मात्र, आमच्या अनेक वर्षांच्या मित्रपक्षाने म्हणजेच वेगळा मार्ग पत्कारण्याचा निर्णय घेत मविआसोबत सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. (CM Eknath Shinde News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT