NCP Political Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? निवडणुक आयोगात आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणुक आयोगात आज सुनावणी

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडणार आहे. आजही आयोगात शरद पवार यांच्याच गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून युक्तिवादाला सुरूवात होणार असून शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत आज युक्तिवाद करणार आहे.

मागच्या सुनावणीवेळी शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड कशी योग्य आहे हे आयोगासमोर सांगितलं होतं. शरद पवार यांची जेंव्हा सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड चुकीची होती, असा दावा अजित पवार यांच्या युक्तिवादादरम्यान केला होता. त्याला शरद पवार यांच्या गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देत ती निवड बेकायदेशीर होती तर मग तेंव्हाच तुम्ही दाद का मागितली नाही असा सवाल उपस्थित केला होता.

सोबतच अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा करण्याच कार्य म्हणजे विश्वासघातकी प्रकारातील असल्याचा युक्तिवाद केला होता. माध्यमांमध्ये सुनावणी लवकर संपवून निकाल लागेल हे अजित पवार यांच्या गटाकडून सांगितलं गेल्याच्या दाव्यावरही कामत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आयोगाने नाराजी व्यक्त करत दोन्ही गटांना माध्यमांशी बोलताना काळजी घ्यायला सांगण्यात आलं होतं.

तर, आजच्या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून स्वता: शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, आ. सुनिल भुसारा उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. तर, अजित पवार यांच्या गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, समिर भुजबळ, सुरज चव्हाण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT