सहकारी संस्थांच्या निवडणुकांना गती! बाजार समित्यांचीही तयारी
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना गती! बाजार समित्यांचीही तयारी Sakal
महाराष्ट्र

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना गती! बाजार समित्यांचीही तयारी

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरात ठप्प असलेल्या तब्बल 67 हजारांहून अधिक सहकारी संस्थांपैकी 17 हजार 847 संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती देण्यात येत आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) संसर्गामुळे राज्यभरात ठप्प असलेल्या तब्बल 67 हजारांहून अधिक सहकारी संस्थांपैकी (Co-operative Societies) 17 हजार 847 संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. जून 2022 पर्यंत सर्वच संस्थांच्या निवडणुकीचे काम सुरळीत होईल, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे (State Cooperative Electoral Authority) आयुक्त डॉ. जगदीश पाटील (Dr. Jagdish Patil) यांनी 'सकाळ'ला दिली.

डॉ. पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी 'सकाळ"ला सदिच्छा भेट दिली. 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. आयुक्त डॉ. पाटील म्हणाले, की कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका घेता येणे अशक्‍य होते. राज्यात अशा 67 हजारांवरील संस्थांच्या निवडणुका घेऊन हे काम जून 2022 पर्यंत संपविण्याची योजना आहे. त्यानंतरच्या काळात मुदत संपणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नियमित होईल, याबाबत तयारी झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील 22 हजारांवर संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तिसरा टप्प्यातील निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजेल. यामध्ये 19 हजारांवर संस्थांचा समावेश आहे. यंत्रणा मर्यादित असल्याने अडचणी येत आहेत. परंतु सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाप्रमाणे अधिकार आहेत. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा सरकारी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा आपल्याला घेता येते. तसेच वाहनांचेही अधिग्रहण करता येते. राज्यातील 1500 कर्मचाऱ्यांची यासाठी गरज पडणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे. आणखी काही ठिकाणी मनुष्यबळाची गरज पडल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करता येते.

संपूर्ण भारतात महाराष्ट्रातच सहकारी संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेलेले असल्याचे सांगून डॉ. पाटील यांनी सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर विवेचन केले. राज्यातील 241 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्याही निवडणुका घ्यावयाच्या आहेत. नवी मुंबई, नागपूर येथील बाजार समितीच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आल्या. आता अन्य बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू आहे.

11 जिल्हा बॅंकांची तयारी

शासनाचा आदेश आल्याने सोलापूरसह राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक वगळता राज्यातील अकरा जिल्हा सहकारी बॅंकांच्या निवडणुकीची तयारी सध्या सुरू आहे. या निवडणुका लवकरच होतील, असे आयुक्त डॉ. पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT