hasan mushrif sakal
महाराष्ट्र बातम्या

‘KDC’ च्या नऊ जागांवर निवडणूक लागणार ; हसन मुश्रीफांचा दावा

हसन मुश्रीफ; संपूर्ण निवडणूक बिनविरोध होणे अशक्य

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: जिल्हा बँकेच्या (Bank Election 2021) तालुका विकास सोसायटी गटातून काहींनी तयारी केल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होणे अशक्य असल्याचा पुनरूच्चार करत ग्रामविकास मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ (Hasan MUshrif) यांनी किमान नऊ जागांवर निवडणूक लागेल, असा अंदाच आज पत्रकारांजवळ व्यक्त केला. तथापि काही जागा सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत बँकेच्या मुख्य कार्यालयात मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

बैठकीनंतर म्हणाले, ‘‘विकास संस्था गटातील बारा तालुक्यापैकी काही तालुक्यातील निवडी बिनविरोध होतील; पण काही तालुक्यात या गटातूनही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. यापूर्वीही या निवडणुकीबाबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली; पण त्यानंतर निवडणूक पुढे ढकलल्याने ही चर्चा थांबली होती. आज याबाबात जिल्ह्यातील काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील, पी. एन. पाटील, (Satej Patil,P.N.Patil) शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक, (Sanjay Mandlik)‘जनसुराज्य’ चे आमदार विनय कोरे (Vinay Kore)यांच्याशी चर्चा करून काही जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली.’’

‘‘विकास संस्था गटातील बारा तालुक्यापैकी काही तालुक्यातील निवडी बिनविरोध होतील; पण काही तालुक्यात या गटातूनही निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

तालुक्यात विकास संस्था गटात काहींनी तयारी केली आहे. त्यामुळे अशा तालुक्यात निवडणूक लागणार आहे. बँकेची सगळी निवडणूक बिनविरोध करणे अशक्य आहे; पण जास्तीत जास्त नऊ जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

पी. जी. यांच्याऐवजी सौभाग्यवती

गगनबावडा विकास संस्था गटातून विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांच्याविरोधात पालकमंत्री सतेज पाटील यांनीच जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे या गटातून शिंदे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नींना महिला प्रतिनिधी गटातून उमेदवारी देण्यावर या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.

राखीव गट बिनविरोध अशक्य

बँकेच्या एकूण २१ जागांपैकी विकास संस्था गटात १२ जागा आहेत. या १२ जागा वगळता प्रक्रिया व महिला गटातील प्रत्येकी दोन, पतसंस्था, दूध व इतर संस्था गटासह अनुसुचित जाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा नऊ जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तथापि पतसंस्था गटातून श्री. कोरे हे प्रा. जयंत पाटील यांच्यासाठी तर आमदार आबिटकर हे आपले बंधू अर्जुन आबिटकर यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रक्रिया गटातील आसुर्लेकर यांना श्री. कोरे यांनी विरोध करून प्रदीप पाटील-भुयेकर यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या दोन गटातही निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

विकास संस्था गटात या तालुक्यात रंगणार सामना

शाहूवाडी - संचालक सर्जेराव पेरीडकर - मानसिंगराव गायकवाड

राधानगरी - ए. वाय. पाटील- विश्‍वनाथ पाटील-गुडाळकर

शिरोळ -राज्‍यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर - गणपतराव पाटील

आजरा - अशोक चराटी- मुकुंद किंवा सुधीर देसाई यांच्यापैकी एक

गडहिंग्लज - संतोष पाटील - विनायक उर्फ अप्पी पाटील

भुदरगड - के. पी. पाटील- के. जी. नांदेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT