Imperial data Chhagan Bhujbal on bjp obc reservation mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह होतील निवडणुका; भुजबळांना विश्वास

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मध्य प्रदेशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील, असं ठामपणे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. (Elections with OBC reservation will also be held in Maharashtra trust Chhagan Bhujbal)

भुजबळ म्हणाले, "सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपणही आता आपल्या आयोगाच्या अहवालाची घोषणा करणार आहोत. एकूण काय तर महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह निवडणुका निश्चितपणे होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यामुळं केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात ओबीसी आरक्षण निश्चितच वाचेल"

सुप्रीम कोर्टानं काय दिला निर्णय?

सुप्रीम कोर्टानं बुधवारी मध्य प्रदेश सरकारच्या ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर सुनावणी करताना ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळं मध्य प्रदेशातील आरक्षणाचा तिढा सुटला आहे. पण महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा पेच अद्याप कायम आहे.

विरोधकांचा मविआवर टीका

मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यातील भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळं महाराष्ट्रानं ओबीसी आरक्षण गमावल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी आणि राज्यातील ओबीसी नेत्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मध्य प्रदेश सरकारनं तत्परतेनं डेडिकेटेड आयोग नेमून सुप्रीम कोर्टानं सांगितलेल्या ट्रिपल टेस्टची पूर्तता केल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune News : बालगंधर्वच्या आवारात हॉटेलचे पार्किंग; हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला केले मॅनेज

Hyundai Salary Hike : ह्युंदाई कर्मचाऱ्यांना नवरात्रीची मोठी भेट, मिळाली 'इतक्या' हजारांची भरघोस पगारवाढ

SCROLL FOR NEXT