Electricity Bill esakal
महाराष्ट्र बातम्या

Electricity Bill : ऑनलाईन लाईट बिल भरायची भीती वाटते ? अशी घ्या काळजी

सध्याच्या घडीला अनेक प्रकारचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जातात

सकाळ डिजिटल टीम

Electricity Bill : सध्याच्या घडीला अनेक प्रकारचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जातात. डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच सायबर क्राइममध्येही वाढ झाल्याचे दिसून येत असून, एका चुकीच्या पावलामुळे बँक खाते रिकामे झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच ऑनलाइन वीज भरताना काही गोष्टींचे पालन न केल्यास तुमचेही बँक खाते रिकामे होऊ शकते.

सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधले आहेत, जे ऑनलाइन वीजबिलाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. अनेक वीज कंपन्या आणि पुरवठादार ग्राहकांना बिल जारी झाल्यावर SMS किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे रक्कम आणि पेमेंटची तारीख कळवतात. वीजबिलाच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार अशाच प्रकारचे संदेश पाठवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत.

नेमकी काय काळजी घ्यावी?

- जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम तो मेसेज व्हेरिफाईड आयडी किंवा कोणत्या मोबाईल नंबरवरून पाठवला गेला आहे हे तपासा.

- जर तो मेसेज एखाद्या नंबरवरून पाठवला असेल तर तो फेक आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

- अशा मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कधीही संपर्क करू नका.

- तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणाशीही शेअर करू नका. अन्यथा, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

- या सर्व गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daund ZP Election Result : दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७ पैकी ६ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले

Pune Crime : फसवणुकीच्या गुन्‍ह्यात पसार झालेल्या पोलिस हवालदारास आंध्रप्रदेशातून अटक

Chandrakant Patil : राज्यातील विरोधकांची ताकद संपली; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पंतप्रधान मोदींनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार, म्हटले ''पुन्हा एकदा...''

Vihamandava News : विहामांडवा जि.प. गटात शिवसेनेचा झंझावात; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदला

SCROLL FOR NEXT