Electric-Supply-Cutting
Electric-Supply-Cutting Sakal
महाराष्ट्र

पश्‍चिम महाराष्ट्रात दहा दिवसांत २७ हजार ६१८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा

पश्चिम महाराष्ट्रातील घरगुतीसह सर्व वर्गवारीतील १३ लाख १८ हजार ९०० थकबाकीदारांकडे तब्बल दोन हजार ३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

पुणे - पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) घरगुतीसह सर्व वर्गवारीतील १३ लाख १८ हजार ९०० थकबाकीदारांकडे (Arrears) तब्बल दोन हजार ३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या वीजबिलांची (Electricity Bill) थकबाकी आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये महावितरणने २७ हजार ६१८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित (Electricity Supply Cutting) केला. दरम्यान, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र या महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे थकबाकीदाराविरोधात वसुलीची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा इतर अकृषिक वर्गवारीतील १३ लाख १८ हजार ९०० ग्राहकांकडे दोन हजार ३२ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित झाला आहे. त्यांच्यासाठी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेनुसार १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ केले आहे. त्यानंतरची मूळ थकबाकी भरण्यास सहा हप्त्यांची सोय उपलब्ध आहे, तर एकाच वेळी मूळ थकबाकी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के व लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकबाकीमध्ये अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे. यासोबतच कृषिपंप वीजग्राहकांसाठी असलेल्या थकबाकीमुक्ती योजनेत ३१ मार्च २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करून घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. परंतु, वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणाऱ्यांवर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.

गेल्या दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात १८ हजार ४४८, सातारा २५१७, सोलापूर १९५८, कोल्हापूर २८९६ आणि सांगली जिल्ह्यातील १७९९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. थकबाकीदारांकडे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले, तरी बिलाची रक्कम किती आहे, हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकबाकी, तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ऑनलाइन वीजबिल भरण्याची सोय

घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइट व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, असेही महावितरणने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT