Nitin Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्‍यात भारनियमन होणार नाही; ऊर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : राज्यात भारनियमन होणार का? या प्रश्नावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले की, राज्यात भारनियमनाच्या नुसत्याच वावड्या उठत असून गेल्या २० ते २५ दिवसांपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात भारनियमन होत नसल्याचा दावा केला आहे. तसेच यापुढेही राज्‍यात भारनियमन होवू देणार नसल्‍याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भुसावळ येथे दिली, आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. (load shedding in Maharashtra)

राज्यात भारनियमण होणार का असा प्रश्न उर्जामंत्र्यांना करण्यात आला होता, त्या प्रश्नाला उत्तर देताना तेे म्हणाले की, 'राज्यातील विविध ठिकाणी वीज भारनियमनाबाबत अनेक संभ्रम आहेत. राज्यात कुठेच गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून कुठेच भारनियमन नाही. भारनियमनाबाबत राज्यात नुसत्याच वावड्या उठवल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीत कुठेच भारनियमन नाही, तसेेच यापुढे राज्यात कुठेच भारनियमन होणारही नाही, असा विश्वास यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.

या आधी काल नाशिकमध्ये बोलताना देखील ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रातील औष्णिक वीज प्रकल्पांसाठी कोळशाच्या उपलब्धतेची स्थिती अद्याप सुधारलेली नाही, परंतु राज्य सरकारने राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT