TET Exam  Sakal
महाराष्ट्र बातम्या

TET Exam : शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात नवा ट्विस्ट, ईडीकडून गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra TET Exam Fraud Case Update : महाराष्ट्रातील शिक्षक भरती घोटाळ्यात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकणात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली व एका मुलाचे नाव समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, आता या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सत्तांरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सत्तारांकडून आरोपांचे खंडन

याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच टीईटी परीक्षा न देता देखील यादीत नावे आली असून, यादीत नावे टाकली त्यांच्यावर कारवाई करा असेे सत्तारांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहिजे असेही सत्तार यांनी म्हटले आहे. माझ्याकडे काल दुपारी साडे अकरा वाजता यादी आली, त्यानंतर मी स्पष्टीकरण दिलं की कोणीतरी खोटी बातमी चालवत असून, कोणीतरी आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नाहक बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केले आहे.

कायद्यानुसार त्यामध्ये काही चूक असेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणात माझ्या परिवाराची चूक असेल किंवा मी फायदा घेतला असेल, तर मी गुन्हेगार आहे. मात्र या यादीमध्ये ज्यांनी नावे टाकली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे देखील सत्तार यावेळी म्हणाले.

प्रवीण दरेकरांचे ट्वीट

"टीईटी घोटाळ्याच्या संदर्भात विधानपरिषदेत मी आणि तात्कालीन विरोधीपक्षनेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता. या प्रकरणात या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम्ही त्यावेळी केला होता. पण आता एक विदारक सत्य बाहेर आलं असून शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा यामध्ये सामावेश असल्याचं समोर आलं आहे." असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

टीईटी घोटाळा हा शिक्षण क्षेत्रातला मोठा कलंक आहे, मात्र अब्दुल सत्तारांनी सुद्धा आव्हान दिलंय की माझ्या मुलांचा यामध्ये सामावेश असेल तर मी कोणत्याही शिक्षेस तयार आहे. त्यामुळे काही काळात सत्य समोर येईलंच. या टीईटी घोटाळ्याचं खरं सत्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येण्याची गरज असून या निमित्ताने ते बाहेर येईल अशी अपेक्षा भाजपचे नेते प्रविण दरेकरांना व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT