तात्या लांडगे
सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यातून तब्बल २८८ टीएमसी पाणी वाहून गेले. त्यात सीना नदीतून सुमारे ८३ टीएमसी, भीमा नदीतून १७७ टीएमसी आणि हिप्परगा तलावातून जवळपास २८ टीएमसी पाणी खाली सोडून देण्यात आले. सध्या हिप्परग्यातून सुमारे १० हजार क्सुसेक, उजनीतून ४० हजार क्युसेक आणि सीना नदीतून एक लाख क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. सोलापूर शहराला पिण्यासाठी दरवर्षी साधारणत: दोन टीएमसी पाणी लागते.
उजनी धरणाची क्षमता १२३ टीएमसीपर्यंत असून, हिप्परगा तलावाची क्षमता ३.३२ टीएमसी आहे. सीना नदीचे पात्र ५० हजार क्युसेक पाणी मावेल इतके पसरले आहे. यंदाच्या पावसाळ्यात भीमा नदीला तिसऱ्यांना तर सीना नदीला ६०-७० वर्षांनंतर पहिल्यांदाच महापूर आला. हिप्परगा तलावातून १६ ऑगस्टपासून आदिला नदीतून पाणी सुरूच आहे. जिल्ह्यातील सीना व भीमा नद्यांसह त्यांच्या उपनद्यांनाही पूर आलेला सर्वांनी पाहिला.
अनेकांनी आम्ही पहिल्यांदाच इतका महापूर पाहिला, आजवर इथपर्यंत पाणी आले नव्हते अशा चर्चा गावागावात सुरू आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातील लहान-मोठे बंधारे, मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे पुढे पाऊस पडल्यास जिल्ह्यातून कर्नाटकात गेलेले पाणी (टीएमसी) आणखी वाढणार आहे.
कधीपासून सुरू आहे पाणी...
उजनी धरणातून २० जूनपासून पाणी सुरू आहे.
९५ दिवसांपासून भीमा नदीत पाणी सोडणे सुरूच आहे.
हिप्परगा तलावातून १६ ऑगस्टपासून पाणी सुरू आहे.
४० दिवसांपासून आदिला नदीचा प्रवाह सुरू आहे.
सीना नदीतून ऑगस्टपासून पाणी सुरूच आहे.
२१ सप्टेंबरपासून सीनेला महापूर आला आहे.
२५ वर्षांत तिसऱ्यांदा उजनीतून १७७ टीएमसी पाणी
उजनी धरणातून २००५ मध्ये २५९ टीएमसी तर २००६ मध्ये ३१४ टीएमसी पाणी भीमेतून सोडून देण्यात आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये १६५ तर २०२२ मध्ये १७४ टीएमसी पाणी पूरस्थिती नियंत्रणासाठी सोडून द्यावे लागले होते. यावर्षी आतापर्यंत सुमारे १७७ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले असून, अजूनही पाणी सोडणे सुरूच आहे. दरम्यान, मागील २५ वर्षांत सीना नदी व हिप्परगा तलावातून इतके दिवस आणि एवढा मोठा विसर्ग जिल्ह्यातून कधी गेलेला नव्हता, असेही जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात. इतके पाणी उजनीनीतून सोडले, पण महापूर येईल अशी स्थिती निर्माण झाली नाही. अधिकाऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पूरनियंत्रणासाठी वेळोवेळी विसर्ग कमी-अधिक केल्याने पुराचे संकट टळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.