Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीय अस्मितांना मिळालं बळ - राज ठाकरे

जातीचा मुद्दा संबंधीत जातीतील नेत्यांना मोठा करण्यासाठी पुढे आणला जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात एकमेकांच्या जातींबद्दलचा द्वेष वाढतोय. महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेवरचा हा डाग आहे. पण राज्यातील या जातीय अस्मितांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जन्मानंतरच बळं मिळालं, असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केला आहे. एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंदुत्वाच्या राजकारणाविरोधात जातीचं राजकारण सुरु झालंय का? या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र आता जातीपातीत गुंतला आहे. गेल्या काही वर्षात जातीय राजकारणात वाढ झाली आहे. जातीचा मुद्दा संबंधीत जातीतील नेत्यांना मोठा करण्यासाठी पुढे आणला जात आहे. सर्वांना आपल्या जातीचा अभिमान असावा पण त्यापेक्षा दुसऱ्याच्या जातीचा द्वेषच जास्त निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात या जातीय अस्मितांना बळ मिळालं आहे."

'जेम्स लेन' प्रकरण रचलं गेलं

जेम्स लेन कुठून आला? त्यानं कुठलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? असे प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले, "हे पुस्तक कोणी लिहिलं तर ब्राह्मणांनी लिहिलं असं सांगू ते मराठा समाजापर्यंत पोहोचवलं गेलं. हे सगळं कट-कारस्थान आहे." काही जणांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी या गोष्टी रचल्या असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT