Two Hundred free medical checkups on the memory of Vilasrao Deshmukh  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Vilasrao Deshmukh : तेव्हा विलासरावांनी अमेरिकेतून रात्री अडीच वाजता फोन करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला!

आज विलासराव देशमुख यांची जयंती आहे.

वैष्णवी कारंजकर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी आहे. राजकारणातले राजहंस अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या आठवणी आजही सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या नेत्यांपर्यंत अनेकांच्या मनात कायम आहेत. त्यांचे किस्सेही सतत चर्चेत असतात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे. विलासराव देशमुखांनी तेव्हा रात्री अडीच वाजता अमेरिकेतून फोन करून शेतकऱ्यांचं आंदोलन सोडवलं होतं.

राजू शेट्टी म्हणाले, "सरकारचे नाक दाबल्याशिवास तोंड उघडत नाही. त्यामुळे आंदोलने करावी लागतात. राजकीय नेत्यांनी मुंबई फार प्यारी असते. त्यामुळे दूध दराचा प्रश्‍न आल्यावर मी मुंबईचे दूध तोडायचे ठरवले. चार दिवस मुंबईत दूध येऊ दिले नाही. मुंबईतील लोकांइतकेच राजकीय नेतेही अस्वस्थ झाले."

"विलासराव देशमुख त्यावेळी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांनी तेथून रात्री अडीचला मला फोन केला. आंदोलन मागे घ्या, दोन दिवसांत आर. आर. पाटील तुमच्यासोबत बैठक घेतील आणि दूध दरवाढ होईल, अशी ग्वाही दिली.पण इतक्‍या सहजासहजी शेतकऱ्यांना काही मिळत नाही. त्यावेळीही तसेच झाले. विधानसभेत आवाज उठवावा लागला. दोन दिवस विधानसभा बंद पाडली. मग कुठे दोन रुपयांची दरवाढ मिळाली", असंही राजू शेट्टी पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT