Ashok Chavhan Profile
Ashok Chavhan Profile Esakal
महाराष्ट्र

Ashok Chavhan: अशोक चव्हाणांसोबत आणखी एका आमदाराचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश? मोठी माहिती आली समोर

अंकिता खाणे (Ankita Khane)

Ashok Chavhan: ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे बंडाच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात अभेद्य राहिलेल्या काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. आज अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (ex Congress Leader and former CM Ashok Chavan will be join BJP today media reports)

आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांच्यासह राजूरकरांचा भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडणार आहे. अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

काल (सोमवारी) माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाणांनी येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करेन असं सांगितलं होतं. मात्र, ते आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप पक्षप्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT