anil deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, चौकशी सुरुच- CBI

कार्तिक पुजारी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रकरणी सीबीआयचा अहवाल व्हायरल झाल्याचं समोर आलं होतं. या अहवालाप्रकरणी सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रकरणी सीबीआयचा अहवाल व्हायरल झाल्याचं समोर आलं होतं. या अहवालाप्रकरणी सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार 100 कोटी वसुलीप्रकरणी चौकशी अद्याप सुरुच असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. त्यामुळे आज दिवसभरापासून सुरु असलेल्या चर्चांवर पडदा पडला आहे. (Maharashtra Latest News)

सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, असा दावा अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आता सीबीआयने स्वत: समोर येऊन या अहवालाबाबत खुलासा केला आहे. आमच्याकडून अनिल देशमुख यांना क्लीनचीट देण्यात आलेली नाही. याप्रकरणी उद्याप चौकशी सुरु आहे. शिवाय पुराव्याच्या आधारावरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं ते सीबीआयने म्हटलंय.

हायकोर्टाने 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सीबीआयने तपास सुरु केला आणि 23 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाचे पुरावे मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. याचा पुनरुच्चार सीबीआयने आज पुन्हा एकदा केला. याप्रकरणात कोणालाही क्लीनचिट देण्यात आलेली नाही. पुराव्याच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय याप्रकरणाची केस बंद करत असल्याचा कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असं सीबीआयने म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT