Amit Deshmukh
Amit Deshmukh Google
महाराष्ट्र

पदव्‍युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या परीक्षा 16 ऑगस्‍टपासून

अरुण मलानी

नाशिक : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (PG Medical Exam) विद्यार्थ्यांची कोविड (Covid 19) परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा 16 ऑगस्‍टपासून घेतल्‍या जाणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी गुरुवारी (ता.27) निर्देश दिले आहेत. (examinations for postgraduate medical courses will be held from August 16 says amit deshmukh)


मंत्री देशमुख म्‍हणाले, की विद्यापीठाची उन्हाळी सत्र 2021 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा 24 जूनपासून नियोजित होती. कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा पुढे ढकलली होती. आता परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना 45 दिवसांचा कालावधी मिळेल. विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कोविड-19 आजारासंबंधी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून घेतल्‍या जातील. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ई-पास म्हणुन विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे प्रवेशपत्र वितरीत केले जाणार आहे, त्यालाच ई-पास ऐवजी मान्यता दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती व वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द केले जाणार आहे.

उन्हाळी सत्र 2021 मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात देशमुख यांच्‍या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीस विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरव विजय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे मा. अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी उपस्थित होते. ऑनलाईन बैठकीस उपस्थितांचे आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी मानले.


पॉझिटिव्‍ह विद्यार्थ्यांच्‍या पुर्नपरीक्षेबाबत लवकरच निर्णय

लेखी परीक्षा दिली आहे, परंतू परीक्षेनंतर व प्रात्यक्षिक परीक्षेआधी कोरोना पॉझिटिव्‍ह झालेल्‍या विद्यार्थ्याची विलगीकरण कालावधीनंतर स्वतंत्रपणे त्‍याच प्रात्यक्षिक परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाईल. तसेच लेखी परीक्षेआधी कोविड-19 पॉझिटिव्‍ह आल्‍याने लेखी परीक्षेस बसु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची पुर्नःपरीक्षा घेण्याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde : ओबीसी मेळाव्यांना अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी; धनंजय मुंडेही सोबतीला...

Latest Marathi Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार 'वर्षा'वर

'PM Kisan'च्या 17व्या हप्त्याची घोषणा; जाणून घ्या, कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : पोर्तुगालचा 39 वर्षाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो युरो कपनंतर घेणार निवृत्ती?

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

SCROLL FOR NEXT