Students_SSC 
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने शुक्रवार (ता. ९) ते रविवार (ता. ११) दरम्यान भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. आता रविवारपर्यंत अतिविलंब शुल्कासह खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ
दहावीच्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा : http://form17.mh-ssc.ac.in
बारावीच्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा : http://form17.mh-hsc.ac.in

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT