Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

घोड पेंड खातय म्हणूनच मंत्री मंडळाचा विस्तार नाही - अजित पवार

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पुणे - राज्यात नवे सरकार स्थापन झाले, या सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. मग सध्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच का घेत आहेत. घोड पेंड खातय म्हणूनच मंत्री मंडळाचा विस्तार नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोघे सध्या महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहे. १६५ आमदार पाठबळ आहे मग मंत्री मंडळाचा विस्तार करायला का घाबरत आहे. कुठे तरी घोडं पेंड खत असल्याने अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. राज्यात अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व मी उपमुख्यमंत्री होते, पण या काळात मी कधीच मुख्यमंत्र्यांच्या समोरील माईक कधीच खेचला नाही, अशी शब्दात फडणवीस यांच्यावर टीका केली.

सध्या पाऊस पडतो आहे, पण पावसाळा उशीर सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने लक्ष देऊन मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पुन्हा सरपंच आणि नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला आहे. पण सरपंच, नगराध्यक्ष एका विचाराचा आणि बॉडी दुसऱ्या विचाराची असं होत. या दोघांनी लोकशाहीला मारक असा निर्णय आहे.

केंद्र सरकार पुन्हा गॅसचे दर वाढवले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून आम्ही काही तरी करतो आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पेट्रोल डिझेल भाव कमी करण्यामागे नागरिकांना फार फायदा होणार नाही. राज्याला सध्या आपत्ती व्यवस्थापनाला संचालक नाही. अनेक वेळा पुर येतो, ढगफुटी होत असते त्यावेळी मदत खात्याला सचिव महत्त्वाचा असतो या सरकारचे हे अपयश आहे. ही तर सुरवात आहे यांच्यात आत्तापासून ओढा ओढी सुरू आहे पुढे महाराष्ट्राला बरेच काही पाहावं लागले. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यायचा निर्णय हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत विषय आहे. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी वक्तव्य करताना उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये, अशा शब्दात पवार यांनी कान टोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : इटलीत बंद पाडलेली विषारी 'यंत्रणा' रत्नागिरीत... कोकणचं भविष्य धोक्यात?, PFAS काय आहे? Italy मध्ये काय घडलं होतं?

Mumbai Crime: वर्दीला कलंक ! मुंबईत गजबजलेल्या उद्यानात पोलिस अधिकाऱ्याचे गतीमंद महिलेसोबत अश्लील कृत्य, नागरिकांनी बेदम चोप दिला अन्...

Pune Scam : पुणेकरांनो अलर्ट! मोबाईलवर RTO कडून आलाय ई-चलनचा मेसेज? आता बँक अकाऊंट होईल रिकामं..नेमका फ्रॉड काय पाहा

Satara News: अभिजीत बिचुकलेंचा नवा विक्रम! जुन्या मतांच्या रेकॉर्डला टाकले मागे, अपक्ष उमेदवारांच्या यादीत मिळवले दुसरे स्थान..

न्याय राहुदे पण अन्याय तरी करू नका, आंदेकरांना तिकीट दिलंत तर..., बंडू आंदेकरांच्या लेकीचा सर्वपक्षीयांना इशारा

SCROLL FOR NEXT