Shivaji Maharaj sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivaji Maharaj : विषप्रयोग की विषमज्वर; शिवाजी महाराजांच्या मृत्यूचं नेमकं सत्य काय ?

सईबाईंचा मृत्यू महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीच झाला होता. मात्र या बखरीत सईबाई राज्याभिषेकाला उपस्थित असल्याचे म्हटले आहे.

नमिता धुरी

मुंबई : ३ एप्रिल १६८० महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा आणि तितकाच दुर्दैवी दिवस. कारण याच दिवशी महाराष्ट्राचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू झाला.

अखेरच्या क्षणी महाराजांजवळ त्यांची पत्नी सोयराबाईसाहेब होत्या. त्यांनीच महाराजांवर विषप्रयोग केल्याचं म्हटलं जातं. पण दुसऱ्या बाजूला महाराजांचा मृत्यू गंभीर ज्वराने झाल्याचंही म्हटलं जातं. पण मग यापैकी खरं काय ? (facts about shivaji maharaj death Did Soyarabai really use poison on Shivaji Maharaj? ) हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

शिवदिग्विजय या बखरीत म्हटल्याप्रमाणे, राजगादीवर शंभूराजांना न बसवता राजारामाला बसवावे याबाबत सोयराबाई आग्रही होत्या. त्यांचा हा मनसुबा महाराजांना मान्य नसल्याने सोयराबाई नाराज होत्या. सूडाच्या भावनेतून त्यांनी महाराजांवर विषप्रयोग केल्याचे बखरीत म्हटले आहे.

ही बखर १९व्या शतकातील असून तिचा लेखक अज्ञात आहे. या बखरीतील काही घटना चुकीच्या असल्याने बखरीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहाते.

सईबाईंचा मृत्यू महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीच झाला होता. मात्र या बखरीत सईबाई राज्याभिषेकाला उपस्थित असल्याचे म्हटले आहे.

मल्हार रामराव चिटणीस यांनीही आपल्या बखरीत विषप्रयोगाचा उल्लेख केला आहे. मात्र या दोन्ही बखरी महाराजांच्या मृत्यूनंतर १५०-२०० वर्षांनी लिहिल्या गेल्या आहेत. महाराजांच्या मृत्यूबद्दल कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे विषप्रयोगाबद्दल साशंकता निर्माण होते.

महाराजांच्या सेवेत असलेल्या दत्ताची वाकनीस यांनी त्यांच्या बखरीत लिहिल्याप्रमाणे औरंगजेबाच्या तावडीतून सुटून आल्यापासून महाराज आजारी होते. राजारामाच्या विवाहातही त्यांची प्रकृती खालावलेली होती.

लहान-मोठ्या मोहिमा करून आल्यावरही महाराजांना थकवा जाणवत असे. त्यांनी इंग्रजांकडून विषमज्वराची औषधे मागवल्याचा उल्लेखही इंग्रजी पत्रांमध्ये आहे.

इंग्रजी पत्रव्यवहारांमध्ये महाराजांना ब्लडी फ्लक्स झाल्याचे म्हटले आहे. हा आजार पशु-पक्ष्यांच्या सहवासात असलेल्या व्यक्तीला होतो. यात शरीराचे तापमान भयंकर वाढते व रूग्ण दगावतो. महाराजांच्या मृत्यूनंतर काहीच दिवसांत ही बातमी छापून आली होती.

महाराजांनी बालवयातच स्वराज्य स्थापनेच्या कार्याला सुरुवात केली होती. विविध मोहिमांच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी होणारा मुक्काम, बदलत्या वातावरणाशी येणारा संबंध, यांमुळे महाराजांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत गेला. दुसऱ्या बाजूला वैद्यकशास्त्रही पुरेसे विकसित नव्हते. त्यामुळे कमी वयात महाराजांचे निधन झाले.

"महाराजांवर विषप्रयोग झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. महाराजांची हत्या ब्राह्मणाने केली असा समज काहीजण पसरवतात. काहीजण ही हत्या सोयराबाईंनी केल्याचंही सांगतात. पण याबद्दलचे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे विषप्रयोगाच्या बातम्यांना सत्याचा आधार नाही. महाराजांचा मृत्यू विषमज्वराने झाला. मात्र गुडघी आजार झाला असण्याचीही शक्यता आहे", असे इतिहास संशोधक संजय सोनावणी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पतीने केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT