Protest Against Doctor Murder 
महाराष्ट्र बातम्या

OPD Shut Down: कोलकाता प्रकरणावरुन देशभरात संताप, डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस; OPD सेवा कोलमडल्या, रुग्णांचे हाल

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनं देशभरात अनिश्चित काळासाठी निषेध आंदोलन सुरु केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कोलकात्यात निर्भला प्रकरणासारखं भीषण प्रकरण घडलं असून यामध्ये एका महिला डॉक्टरची अमानुषपणे अत्याचार करुन हत्या करण्यात आली. यामुळं देशभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट असून अनेक राज्यांमध्ये निषेध आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनाला मंगळवार (१३ ऑगस्ट) पासून सुरुवात झाली असून आज याचा दुसरा दिवस आहे. यामुळं रुग्णालयातील ओपीडी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. यामुळं रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.

महाराष्ट्रात आंदोलन कुठे?

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘मार्ड’ (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) हे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. महाराष्ट्रात कालपासून मुंबई-पुण्यात निवासी डॉक्टरांनी दिवसभर आंदोलन केलं. तसंच आज मुंबईत सायन रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. त्याचबरोबर पुण्यात ससून रुग्णालयाबाहेर देखील डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे. ससूनमधील ५६६ निवासी डॉक्टरांपैकी १८० डॉक्टर संपावर आहेत.

‘बीजे’ मेडिकल कॉलेजच्या आवारात सकाळी निवासी डॉक्टरांनी मंगळवारी दंडाला काळ्या फिती लावून निदर्शने केली. तसेच तातडीच्या सेवा वगळता सर्व डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे रुग्णसेवा काही प्रमाणात विस्कळित झाली आहे. वॉर्डमध्येही निवासी डॉक्टर उपस्थित होते. परंतु त्यांची संख्या कमी होती. याचबरोबर रुग्णालयाने डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी क्लिनिकल, पॅराक्लिनिकल स्टाफ आणि शिक्षकांनाही रुजू केले होते. परंतु निवासी डॉक्टरांच्या अभावी नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. मात्र तातडीच्या शस्त्रक्रियांना प्रधान्य देण्यात आले, अशी माहिती प्रशासनाने दिली.

त्याचबरोबर आसाम, पश्चिम बंगाल, तेलंगाणा या राज्यांमध्येही सध्या डॉक्टरांचं निषेध आंदोलन सुरु आहे. यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी विशेष मागण्या त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. हातात फलक घेऊन त्यावर कोलकात्यातील महिला डॉक्टरला न्याय मिळवून द्या, डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्या, नो ड्युटी विथाऊट सिक्युरिटी, न्यायाला उशीर म्हणजे नाय नाकारणे, सुरक्षा ही डॉक्टरांची प्राथमिकता अशा घोषणा यावेळी या डॉक्टरांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT