Farmer companies have started buying tur at 140 shopping centers in 17 districts of the state.
Farmer companies have started buying tur at 140 shopping centers in 17 districts of the state. 
महाराष्ट्र

राज्यात 140 केंद्रांवर शेतकरी कंपन्यांमार्फत तूरखरेदी

सूर्यकांत नेटके

अहमदनगर : तुरीची हमी दराने खरेदी व्हावी, यासाठी 'नाफेड'मार्फत खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांकडूनही तूर खरेदी केली जाणार आहे. सध्या राज्यातील 17 जिल्ह्यांत सुमारे 140 खरेदी केंद्रांवर शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत तूरखरेदी सुरू केली आहे. 

साधारण 550 कंपन्यांचे मिळून महाफार्मर प्रोड्युसर कंपनी (महाएफसी) फेडरेशन स्थापन झाले असून, शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग घेत "महाएफसी' शेतकरीहितासाठी काम करीत आहे. दर वर्षी शेतमालाला हमी दर मिळावा म्हणून सरकारी हमी केंद्रे सुरू करून मूग, उडीद, तूर, हरभरा, सोयाबीन, मका, कांदा यांची खरेदी केली जाते. यंदा सुमारे 50 हजार टन तूरखरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. नगर जिल्ह्यासह राज्यात खरेदी केंद्रे वाढविण्याचा "महाएफसी'चा प्रयत्न आहे. 

बाजारातही दरात वाढ
 
राज्यात यंदा तुरीचे मोठे उत्पादन झाले आहे. शासन सहा हजार रुपये हमी दर देत असले, तरी आतापर्यंत जास्तीत जास्त पाच हजार 200 रुपयांपर्यंतच तुरीला बाजारात दर होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून दरात वाढ होत आहे. सध्या बाजारातही तुरीला पाच हजार 700 पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे हमी दराने खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्रावरील आवकेवर परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

जिल्हानिहाय खरेदी केंद्रे
 
अकोला : 8, अमरावती : 14, औरंगाबाद : 8, बुलडाणा : 14, चंद्रपूर : 5, धुळे : 1, हिंगोली : 8, जळगाव : 1, जालना : 6, लातूर : 20, नांदेड : 17, उस्मानाबाद : 11, परभणी : 7, सोलापूर : 3, वर्धा : 1, वाशीम : 3, यवतमाळ : 13 


राज्यात 'महाएफसी'ने शेतकरी कंपन्यांमार्फत तूरखरेदी केली जात आहे. आतापर्यंत 140 कंपन्यांची खरेदी सुरू आहे. अजून खरेदी केंद्रे वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
- योगेश थोरात, अध्यक्ष, महाफार्मर प्रोड्युसर कंपनी (महाएफसी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

SCROLL FOR NEXT