शेतकऱ्यांचा संप : शासकीय कार्यालयांना टाळे ढोकण्यास सुरुवात
शेतकऱ्यांचा संप : शासकीय कार्यालयांना टाळे ढोकण्यास सुरुवात 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांना ठोकले टाळे

सकाळ डिजिटल टीम

शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा "महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक रोखून धरली आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

शेतकरी आंदोलनाचे आजचे विविध ठिकाणचे चित्र -
■ नगर
नगरमध्ये दूध, फुलांच्या गाड्या अडवल्या
नगरमध्ये आज पहाटे दोनच्या सुमारास टाकळी ढोकेश्‍वर येथे दुधाच्या व फुलांच्या गाड्या अडविण्यात आल्या. दुधाचा टॅंकरही फोडण्यात आला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

■ नाशिक
तलाठी कार्यालयाला कुलूप
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्‍यातील नैताळे येथील तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले आहे.

संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ५ जूनपासून १९ जून पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

येवल्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
नाशिक : येवला तालुक्‍यातील पिंपरी येथील तरुण शेतकरी नवनाथ चांगदेव भालेराव यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

■ सोलापूर
सोलापूरमधील आठवडी बाजार सुरळीत
सोलापूर - शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून येथील मंगळवारचा आठवडी बाजार आज (मंगळवार) बंद राहिल अशी चर्चा होती. मात्र नियमितपणे आजही बाजार भरला आहे. मात्र बहुतांश वस्तुंचे भाव वाढल्याचे आढळून येत आहे. या बाजाराला मोठी परंपरा असून गेल्या दोनशे वर्षांपासून हा बाजार भरत आहे.

सांगली : नवीन कलेक्टर ऑफिससला ठोकले टाळे महेश खराडे व कार्यकर्ते यांना पोलिसांनी अटक केली..

■ सातारा : खटाव तलाठी कार्यालयास शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाेकले टाळे.

कोल्हापूर
शिये येथील तलाठी कार्यालयाला टाळे
रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने शिये येथील तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले

कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलन सुरळीत; गोकुळ, वारणाने सकाळी केले दूध संकलन.

जमावबंदी असतानाही आंदोलन केल्यामुळं कोल्हापूरमध्ये  शिवसैनिकांवर 143, 341, 135 कलमान्वये गुन्हे दाखल

■ सांगली
दूधाचा टॅंकर फोडला
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला राजारामबापू पाटील दूध संघाचा टॅंकर

सांगली : प्रशासकीय कार्यालयाला टाळे लावण्यासाठी आलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड :

  • जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला छावणीचे स्वरुप. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त
  • उमरी तालुक्यात आंदोलन तीव्र. जिल्ह्यात इतर भागातही आंदोलन सुरू.
  • अर्धापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीसह तलाठी कार्यालयांना टाळे ठोकले.

■ परभणी
मानवत: संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला टाळे ठोकून कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी केली.

मुंबई

  • भाज्यांमध्ये टोमॅटो व कोबीचे प्रमाण अधिक असल्याने कोबी व टोमॅटोचे दर घसरले
  • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी भाज्यांच्या आवकमध्ये घट झाली

सातारा
शेती उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प. शेतकरी संघटनेच्या टाळे ठाेक आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे माेठ्या संख्येने पाेलिस बंदाेबस्त.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्या  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT