महाराष्ट्र बातम्या

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न; पुण्याच्या शेतकऱ्याचं निधन

नामदेव कुंभार

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा घडली आहे. दोन दिवसांपूर्वी (20 ऑगस्ट) मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं निधन झालं आहे. दोन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होता. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. पण त्यांची आज प्राणज्योत मालवली.

सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. जाधव यांची जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. न्याय मिळवा म्हणून ते गेल्या शुक्रवारी (ता. २० ) सकाळी अकराच्या सुमारास सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेट प्रवेशद्वारातून मंत्रालयात येण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यांनी गार्डन गेटजवळ कीटनाशक प्राशन केले. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. यावेळी ते त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांच्या नजरेस ही बाब आल्यावर त्यांना पोलिसांनी तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घटनांवर मोठा फरक पडण्याची शक्यता आहे.

48 वर्षीय शेतकरी सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. यामध्ये जाधव यांनी आपल्यावरील अन्याय कसा झालं हे सांगितलं होतं. आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप जाधव यांनी पत्रामार्फत केला होता. या पत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: युक्रेनला ‘नाटो’प्रमाणे संरक्षणाची हमी; अध्यक्ष पुतीन यांची मान्यता

Raigad Rain Update: रायगड जिल्ह्यात मुसळधार! 'पुराच्या पाण्यात अडकलेल्या 30 नागरिकांची सुटका'; पहाटे 3 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन

राज्यात पुढील २४ तास धोक्याचे! मुंबई पुण्यासह कोकणात अती मुसळधार पावसाची शक्यता, बाहेर जाणं टाळा

Mumbai Flood Alert: बापरे! मुंबईत महापूर येणार? मिठी नदीने गाठली धोक्याची पातळी, कुर्ल्यातील निवासी भागात पाणी, व्हिडिओ पाहा

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : मुंबईत अजूनही पाऊस सुरूच, आज सरासरी 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला

SCROLL FOR NEXT