farmer news sakal
महाराष्ट्र बातम्या

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! शेतात बसून करता येईल पीकपेऱ्यांची 7/12 उताऱ्यावर नोंद; एकाच मोबाइलवर करता येईल 20 शेतकऱ्यांना नोंद; फायदे काय? वाचा सविस्तर

शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचूक नोंद सरकार दफ्तरी व्हावी, यासाठी पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. ते शेतकऱ्यांसाठीही लाभदायी असून सरकारची फसवणूकही टळत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई किंवा बॅंकांकडून कर्ज मिळणे देखील सोयीचे होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : चार वर्षांपूर्वी राज्यात शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद तलाठ्यामार्फत केली जात होती. प्रत्यक्ष शेतात न जाता शेतकरी जे पीक सांगेल त्याची नोंद केली जात होती. त्यामुळे नुकसान भरपाईवेळी शेतकऱ्यांसह प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंद नसतानाही मदत लाटली जात असल्याने सरकारचीही फसवणूक होत होती. शिवाय पिकांच्या पेरणी क्षेत्राची नेमकी आकडेवारी नसल्याने प्रशासन व सरकारी स्तरावर नियोजन करता येत नव्हते. फसव्या आकडेवारीवर आधारित नियोजनही कोलमडून पडायचे. त्यामुळे शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचूक नोंद सरकार दफ्तरी व्हावी, यासाठी पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. ते शेतकऱ्यांसाठीही लाभदायी असून सरकारची फसवणूकही टळत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई किंवा बॅंकांकडून कर्ज मिळणे देखील सोयीचे होत आहे.

कशी करावी पीक पाहणी

  • मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून ई - पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा.

  • ॲपवर नवीन खातेदाराची नोंदणी करा.

  • आपला जिल्हा, तालुका व गावाची निवड करा.

  • खातेदारात पहिले नाव, मधले नाव, आडनाव आणि गट क्रमांक टाका.

  • गट क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल. खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल क्रमांक टाका.

  • एसएमएसद्वारे चार अंकी पासवर्ड येईल, तो काय लक्षात ठेवा.

  • परिचयात खातेदाराचा फोटो अपलोड करुन माहिती भरुन सबमिट करा.

  • त्यानंतर होम पेजवर येऊन पिकाची माहिती हा फॉर्म येईल.

  • त्यावर खाते क्रमांक, गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) भरा.

  • हंगाम, वर्ष, पेरणी क्षेत्र, पिकाचा वर्ग, पुन्हा त्याचे क्षेत्र, सिचंन सुविधा, लागवडीची तारीख भरा.

  • त्यानंतर कॅमेरा पर्याय येईल, त्याद्वारे फोट काढून फॉर्म सबमिट करा.

ई- पीक पाहणीचे फायदे

  • शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद

  • दुष्काळ, अतिवृष्टीनंतर नुकसानीपोटी विमा, भरपाईची योग्य नुकसानग्रस्ताला लाभ मिळेल.

  • ना शेतकऱ्यांचे नुकसान, ना प्रशासनाची अडचण, ना सरकारची फसवणूक

  • राज्यासह देशात कोणत्या पिकाचा किती पेरा झाला याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध.

  • पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबाबत अंदाज बांधणे सुलभ होईल.

  • बियाणे, खते उपलब्ध करुन देण्याबाबत सरकारला योग्य नियोजन करता येईल.

  • छायाचित्रासह अक्षांश, रेखांशामुळे कोणत्या भागात कोणत्या पिकाचे व किती पेरा झाला आहे, हेही समजेल.

  • एका मोबाईलवर २० शेतकऱ्यांच्या नोंदी करता येईल. मोबाईल नसल्याने होणारी अडचण येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT