Abdul Sattar esakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar : अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, तो आजचा विषय नाही; सत्तारांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सतत नाना तऱ्हेच्या विधानाने चर्चेत असतात. आज त्यांनी शेतकरी आत्महत्येबाबत एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

गारपीठीमुळे शेतकऱ्यांचं मोठं झालं आहे. सोयगाव येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहाणी केली. त्यानंतर बोलतांना सत्तार म्हणाले की, शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचाः नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सत्तार म्हणाले की, नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मी आलो होतो. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फारकाही नुकसान झालेलं नाही. पहिल्या माहितीनुसार अजिबात नुकसान झालेलं दाखवलं नव्हतं. त्यामुळे वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठं नुकसान नसलं तरी पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश दिल्याचं अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

  • शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही

  • अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात

  • माझ्या मतदारसंघात फिरुन आलो, शेतीचं फार नुकसान झालं नाही

  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार

  • पहिल्या माहितीनुसार नुकसान नव्हतं

  • वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो

  • मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

F-16 लढाऊ विमान हायवेवर कोसळलं, उड्डाणानंतर २ मिनिटांनी रडारवरून गायब; दुर्घटनेचा VIDEO आला समोर

Gold Rate Today: सलग 7 व्या दिवशी सोनं महागलं! सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा ताजा भाव

Kolhapur police action : दहशतीसाठी पिस्तुलाचा वापर, खून मारामारी गंभीर गुन्हे, कोल्हापूर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

Rinku Singh : वडील गंभीर आजाराशी देतायत झुंज, रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर; रिंकु सिंह T20 वर्ल्डकपला मुकणार?

Latest Marathi News Live Update : वाईनशॉप हटवण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT