Solapur Flood Relief

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १२०० कोटी! अतिवृष्टी, महापुराचा ‘या’ तालुक्यातील ४.६९ लाख शेतकऱ्यांचे नुकसान; तलाठ्यांकडे द्या ‘ही’ कागदपत्रे

राज्य सरकारने पूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात जिरायतीसाठी हेक्टरी साडेअठरा हजार रुपये, बागायतीसाठी ३२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने पूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात जिरायतीसाठी हेक्टरी साडेअठरा हजार रुपये, बागायतीसाठी ३२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील चार लाख २९ हजार ६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईपोटी अंदाजे १२०० कोटी रुपये मिळतील.

सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, ऊस, भाजीपाला, कांदा, फळपिके, बाजरी, पेरू, केळी, झेंडू, कडवळ, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष, काकडी, फुले, आंबा, भुईमूग, सूर्यफूल अशा पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बार्शी, माढा, करमाळा, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान झाले आहे.

दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे सरकारने जाहीर करत अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या महसूल मंडलांसाठी सरसकट मदत जाहीर केली आहे. तरीपण, पंचनाम्याचे अहवाल मागण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा पीकनिहाय व क्षेत्रनिहाय अहवाल पाठवला जाणार आहे. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याला किती मदत मिळेल? हे स्पष्ट होणार आहे.

प्राथमिक अंदाजानुसार नुकसान...

  • बाधित गावे

  • ८७०

  • नुकसानग्रस्त शेतकरी

  • ४,६९,३०६

  • बाधित जिरायती क्षेत्र

  • २,९९,७७९

  • बाधित बागायती क्षेत्र

  • ९७,९९९

  • बाधित फळपिकांचे क्षेत्र

  • ३१,२८४

तलाठ्यांकडे द्या कागदपत्रे

अतिवृष्टी, सततचा पाऊस व महापुरामुळे नुकसान झालेल्या महसूल मंडलातील शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. तत्पूर्वी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांकडून बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामा करायला आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडे बाधित शेतकऱ्यांना स्वत:चे आधारकार्ड, बॅंक पासबुक (खाते क्रमांक, आयएफसी कोड) द्यावे लागणार आहे. त्यानंतर तहसीलदार स्तरावर बाधितांची यादी व त्यांचे बॅंक खाते क्रमांक, अशी यादी शासनाला पाठविला जाईल. त्यानंतर त्या बाधितांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल.

तालुकानिहाय एकूण बाधित क्षेत्र

  • तालुका बाधित क्षेत्र शेतकरी

  • द.सोलापूर १७,५०० १८,५००

  • अप्पर मंद्रूप ४१०८ ४७४९

  • उ.सोलापूर ४००० ५८००

  • बार्शी १,१२,७८६ ८८,२७३

  • अक्कलकोट ४७,६०० ४३,४९२

  • मोहोळ २०,९९९ ४०,२७३

  • माढा ७४,७५४ ८६,८१४

  • करमाळा ७१,७९४ ९८,९७०

  • पंढरपूर ७३४२.५ ११,२८८

  • सांगोला २९,७०७ २१,४५३

  • माळशिरस ११,८८५ २२,५६७

  • मंगळवेढा २६,५८६ २७,१२७

  • एकूण ४,२९,०६१.५ ४,६९,३०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur BJP : भाजप तालुका पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, अपहार केल्याचा आरोप सहन झाला नाही अन्

Post-COVID Cancer Surge: कोरोनानंतर कर्करोगाचे सावट! सोलापुरात रुग्णसंख्या दुपटीने, म.फुले योजनेत केमोथेरपीचे प्रमाण वाढले

CM Relief Fund:'सोलापुरातील कारखान्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 15 कोटी मिळणार': मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

IPL vs ICC : प्रत्येकी ५८ कोटी! दोन खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझीकडून ऑफर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची अट...

Latest Marathi News Live Update : ईडीचा अ‍ॅक्शन मोड! मुंबईत ८ ठिकाणी छापे

SCROLL FOR NEXT