महाराष्ट्र बातम्या

Accident News: ऊस तोडणी कामगारांचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १० जखमी

ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते.|

सकाळ वृत्तसेवा

Mangalvedha News: ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे.

सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजता दरम्यान घडली या घटनेतील सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते, (As there is no means of employment they have to choose the option of sugarcane cutting for employment)

येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकने हा अपघात झाला.(The accident happened with a truck from Andhra Pradesh coming from behind.)

मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय 30 रा.शिरनांदगी,जगमा तम्मा हेगडे वय 35, दादा आप्पा ऐवळे वय 17,निलाबाई परशुराम ऐवळे वय 3 रा.चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला व आणि 11 जखमी आहेत जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.

चिक्कलगी व शिरनांदगीत शोककळा

या अपघाताची वृत्त समजतात चिक्कलगी व किंवा शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली असून मयत मजूर व त्यांचे नातेवाईक हे परिस्थितीने गरीब असल्यामुळे त्यांना उपचारासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील व गुलाब थोरबोले यांनी पहाटेची घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी पुढाकार घेतला.(sadness in Shirnandagi village)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT