Pune Solapur Highway esakal
महाराष्ट्र बातम्या

पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुभाजक तोडून कार पलटी, CCTV Footage Viral

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील घटना

रुपेश नामदास

Pune Solapur Highway: पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर सोलापूरच्या दिशेने निघालेली बोलेरो गाडीवरील चालकाचा ताबा सूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावरून पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर धडकली ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाची परिस्थिती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सोलापूरच्या दिशेने बोलेरो या चारचाकी गाडीतून २ जण निघाले होते.

याचवेळी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकला जाऊन धडकली.

दुभाजकला गाडी धडकली असता गाडीने तीन पलटी मारत पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर जाऊन धडकली यामध्ये या बोलेरो चालकाच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली असून कार पलटल्यानंतर कारमधील चालकाला रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. हा सगळा अपघात सी सी टीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Konkan Railway: ब्रिटिशांनाही अशक्य वाटलेली कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणणारे मधु दंडवते, सावंतवाडी स्थानकाला नावासाठी अनेक वर्षे संघर्ष

SCROLL FOR NEXT