Samruddhi Mahamarg Esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 7 जण जखमी

भरधाव कार पलटून हा अपघात झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसुन येत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर आज झालेल्या एका अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेगवान कार उलटून हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार औरंगाबादहून शेगावच्या दिशेने जात होती. गाडीत एकूण 9 प्रवासी होते. मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला. अपघातात 2 मुले 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात जमली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT