Omicronच्या भीतीने घटली शाळांची पटसंख्या! शिक्षण आयुक्‍त म्हणाले...
Omicronच्या भीतीने घटली शाळांची पटसंख्या! शिक्षण आयुक्‍त म्हणाले... esakal
महाराष्ट्र

Omicronच्या भीतीने घटली शाळांची पटसंख्या! शिक्षण आयुक्‍त म्हणाले...

तात्या लांडगे

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आणि देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले.

सोलापूर : दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) ओमिक्रॉन (Omicron) महाराष्ट्रापर्यंत (Maharashtra) पोचला. पिंपरी- चिंचवड (Pimpri-Chinchwad), पुणे (Pune), भिवंडी (Bhiwandi), मुंबई (Mumbai) या ठिकाणी दहा रुग्ण आढळल्यानंतर नुकत्याच सुरू झालेल्या राज्यातील शाळांमधील (School) विद्यार्थ्यांची (Students) पटसंख्या तीन ते साडेतीन लाखांनी घटल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. शाळांनी विद्यार्थ्यांना उपस्थितीचे बंधन घालू नये, असे निर्देश शिक्षण आयुक्‍तांनी (Commissioner of Education) दिले आहेत.

राज्यातील नंदुरबार (Nandurbar), धुळे (Dhule), हिंगोली (Hingoli), अमरावती (Amravati), वाशिम (Washim), बुलढाणा (Buldhana), वर्धा (Wardha), भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia) व गडचिरोली (Gadchiroli) या जिल्ह्यांमधील कोरोनाचा (Covid-19) प्रादुभार्व कमी झाला. त्यामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आणि देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले. भिवंडीत रुग्ण सापडल्यानंतर दोन दिवसांतच पुणे जिल्ह्यात सात रुग्ण आढळले. 28 नोव्हेंबरनंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परदेशातून जवळपास पाच हजारांहून अधिक प्रवासी आले आहेत. त्यांची ऍन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली असून बहुतेक रुग्णांची आरटीपीसीआर टेस्टदेखील निगेटिव्हच आली आहे. तरीही, खबरदारी म्हणून पुणे, मुंबईसह सोलापूर, नाशिक, नगर, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांमधील पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे.

राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या एक लाख 10 हजार 229 शाळांमध्ये दोन कोटी 21 लाख 74 हजार 625 विद्यार्थी आहेत. पुणे जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वाधिक सात हजार 455 शाळा असून त्या ठिकाणी 21 लाखांपर्यंत विद्यार्थी आहेत. दुसरीकडे मुंबईत चार हजार 343 शाळा असून त्या शाळांमध्ये जवळपास 14 लाखांपर्यंत विद्यार्थी आहेत. 'ओमिक्रॉन' बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली असून नागरिकांनी घाबरू नये, लसीकरण करून घ्यावे, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

राज्यातील शाळा बंद ठेवण्यासंदर्भात अजून काहीच निर्णय झालेला नाही. शाळा सुरू ठेवायच्या की बंद करायच्या, यासंबंधीचा निर्णय स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याचे शाळांनी बंधनकारक करू नये.

- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्‍त, मुंबई

राज्यातील शाळांची सद्य:स्थिती...

  • एकूण शाळा : 1,10,229

  • पहिली ते सातवीचे विद्यार्थी : 1,34,84,879

  • आठवी ते बारावीचे विद्यार्थी : 86,89,746

  • शिक्षकांची संख्या : 5,12,063

  • ओमिक्रॉनमुळे घटली पटसंख्या : 3.45 लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT