Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांच्या नावाने फेलोशिप

शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर, शरदचंद्र पवार इनस्पायर लिटररी फेलोशिपआणि शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन या तीन फेलोशिप दिल्या जाणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार असून त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी आणि साहित्य क्षेत्रात काहीतरी नवे करु इच्छिणाऱ्या होतकरू तरुण- तरुणींना तर शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या सहाय्याने काम करणाऱ्या शिक्षकांना शरद पवार इनस्पायर फेलोशिप दिली जाणार आहे. याबाबतची घोषणा चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

त्या म्हणाल्या, ‘‘शरद पवार हे ६० वर्षाहून अधिक काळ देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे ठरले आहेत. शेती क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आजही जनतेला फायदा होत आहे. याशिवाय औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक कल्याण, शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य क्रांतिकारी असून पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.’’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर, शरदचंद्र पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप (शरदचंद्र पवार साहित्य पाठयवृत्ती) आणि शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन या तीन फेलोशिप दिल्या जाणार आहेत. यापैकी शेती आणि साहित्य क्षेत्रातील फेलोशिप चा कार्यक्रम आजपासून सुरू करण्यात येणार असून निवडलेल्या फेलोची घोषणा १ डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवशी निवडलेल्या फेलोंना फेलोशिप सन्मानपूर्वक दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT