police bharati sakal news
महाराष्ट्र बातम्या

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

राज्यात १५ हजार ६३१ पोलिसांची भरती सुरु आहे. त्यात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्डसमन, सशस्त्र पोलिस, कारागृह शिपाई अशी पदे आहेत. सोलापूर जिल्ह्यात १२९ पोलिसांची भरती होणार आहे. तरुण-तरुणींना आता अर्ज करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात १५ हजार ६३१ पोलिसांची भरती सुरु आहे. त्यात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्डसमन, सशस्त्र पोलिस, कारागृह शिपाई अशी पदे आहेत. सोलापूर जिल्ह्यात १२९ पोलिसांची भरती होणार आहे. तरुण-तरुणींना आता अर्ज करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सोलापूर शहर पोलिस दलात ७३ पोलिस शिपाई, ग्रामीण पोलिस दलात ५० पोलिस शिपायांची पदे भरली जाणार आहेत. शहरात तीन बॅण्डसमनचीही पदे भरली जाणार आहेत. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एका पदासाठी अंदाजे ८३ उमेदवारांचे अर्ज आहेत. राज्यात एकाचवेळी मैदानी चाचणीला सुरवात होईल. लेखी परीक्षा एकाच दिवशी घेतली जाणार आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी होईल. त्यात उत्तीर्ण उमेदवारांमधून एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर उमेदवारास एका पदासाठी राज्यात एकच अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील तर त्यांचे बाकीचे अर्ज बाद ठरविले जाणार आहेत. ज्या तरुणांना आतापर्यंत अर्ज करता आलेला नाही, त्यांना रविवारपर्यंत (ता. ७) अर्ज करता येणार आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. ८ डिसेंबरनंतर अर्जांची छाननी होईल. पात्र उमेदवारांची फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सुरु होईल, असे सूत्रांनी सांगितले.

मैदानी अन्‌ लेखी ‘सीसीटीव्ही’च्या कक्षेत

पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. मैदानीवेळी गोळाफेक, धावणे, अशा बाबी असतात. प्रत्येक उमेदवार मैदानी चाचणी देताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील असणार आहेत. याशिवाय लेखी परीक्षावेळी प्रत्येक केंद्रांवर देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. पारदर्शक परीक्षेत कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही. त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

Social Media Impact : सोशल मीडियावर अर्ध-नग्नता; समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम काय असू शकतो?

Ajit Pawar: ''ज्यांनी हे पाप केलं असेल त्यांच्या घरात...'', अमोल मिटकरींच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT