Anil Deshmukh Esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh : अटीशर्तीसह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात जामीन मंजूर

1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. गेल्या 13 महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत; मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध तपास यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा केला आहे. तर देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने ठेवला आहे. वैद्यकीय कारणांसह, वाढते वय आणि आजार अशी कारणे देशमुख यांनी जामीन अर्जात दिली होती.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणार अनिल देशमुख आरोपी आहेत. त्यांना आधी ईडीने अटक केली होती. दरम्यान, ईडी प्रकरणी अनिल देशमुख यांना आधीच जामीन मंजूर करण्यात आला होता. आता सीबीआय प्रकरणातही अनिल देशमुख यांना जामीन मिळला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. ईडीकडून जामीन मिळाल्यानंतरही अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नव्हती. सीबीआय प्रकरणातील गुन्ह्यांमुळे अनिल देशमुख यांनी पुन्हा कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. आता ईडीनंतर अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणातील दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT