Pravin Chavan
Pravin Chavan Team eSakal
महाराष्ट्र

अखेर प्रवीण चव्हाणांनी तेजस मोरेंविरोधात नोंदवली तक्रार; म्हणाले, 'गोपनीयतेचा...'

सकाळ डिजिटल टीम

पुणे: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. त्यांच्या या बॉम्बनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यांच्या या आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan) यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणातून आपल्याला बाजूला होयचं असं वाटल्याने स्वतःहून राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आता प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

प्रवीण चव्हाण यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तेजस मोरे यांच्या विरोधात काल रात्री त्यांनी ही तक्रार दाखल केली असून गोपनीयता भंग, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा यांचा भंग केल्याने गुन्हा दाखल करावा अशी तक्रार त्यांनी नोंदवली आहे. प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये केलेलं स्टिंग ऑपरेशन हे तेजस मोरे यांनी केल्याचा चव्हाण यांनी आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हनंतर या संपूर्ण नाट्याला सुरुवात झाली होती.

याआधी प्रवीण मोरे यांनी म्हटलं होतं की, आपण कोणालाही भेटलो नसून माझं कुठलंही राजकीय संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सादर केलेले स्टिंग ऑपरेशनचे हे तेजस मोरेने सुपारी घेऊन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला असून, यातील खरं नेमकं काय हे तपासातून समोर येईल असे ते म्हणाले.

तेजस मोरेचे सगळे पुरावे आपल्याकडे असून, त्याने मला अनेक वेळा ए सी, स्मार्ट टीव्ही लावायचे हट्ट धरले होते असे चव्हाण यांनी म्हटले असून, तेजस मोरेला आपण येऊ नको असे वारंवार सांगत होतो. परंतु, आपल्याला पसवण्याचा त्याचा उद्धस असल्याने तो वारंवार माझ्याकडे येत असल्याचेही चव्हाण म्हणाले. एवढेच काय तर, माझ्या ऑफिसमधून मोबाईल, लॅपटॉप बॅग चोरीला गेल्याचे सांगत मोरे आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार्यालयात येत असत असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT