FIR Against Sameer Wankhede esakal
महाराष्ट्र बातम्या

वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल; मद्य विक्री परवाना प्रकरण भोवणार?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना कमी वयात मद्यविक्रीचा परवाना मिळविल्याचे प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन मद्य विक्रीचा परवाना मिळवला असल्याची तक्रार पोलिसांत (FIR Against Sameer Wankhede) देण्यात आली आहे. त्यानंतर वानखेडेंविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. या बारसाठी १९९६ ते ९७ या काळात खोटी माहिती देऊन परवाना मिळविला होता. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी समीर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर समीर वानखेडे वादात सापडले होते. ते चुकीच्या कारवाया करतात, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोपही मलिकांनी केले होते. अवघ्या १७ व्या वर्षी वानखेडेंनी बारचा परवाना मिळविल्याचा आरोप देखील मलिकांनी केली होता. त्यानंतर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केली असता परवाना मिळविला त्यावेळी समीर वानखेडेंचं वय कमी असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द केला होता. आता वानखेडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड; रुळावर लोकलच्या रांगा, व्हिडिओ व्हायरल

Mumbai News : सीएसएमटीत चुकीच्या सिग्नलचा गोंधळ; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, स्थानकप्रमुख निलंबित

IPL 2026, SRH vs DC: पॅट कमिन्सचं पुनरागमन नाहीच! हैदराबाद-दिल्ली संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र मोठे बदल

Baramati By Election : सुनेत्रावहिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update : गुजरात महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू - खासदार संजय सिंह

SCROLL FOR NEXT