dasara melava sakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: डब्ब्यातून गोळा केलेली वर्गणी ते पैलवानांची सुरक्षा, पहिल्या दसऱ्या मेळाव्याचा इतिहास

शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा कसा साजरा करण्यात आला?

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचा दसरा मेळावा हा विशेष प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यंदाचा दसरा मेळावा विशेष चर्चेचा विषय होता. गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावावरुन राज्यभरातील सुरू असलेला वाद सर्वांनीच पाहिला आणि अखेर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे साजरा होण्याचं ठरलं. एक पिढ्याना-पिढ्या चाललेला शिवसेनेचा दसरा मेळावा तर दुसरीकडे शिंदे यांचा दसरा मेळावा. त्यामुळे यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळावाकडे सर्वांचे लक्ष लागले.

पण तुम्हाला माहिती आहे का शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा कसा साजरा करण्यात आला? आणि या दसऱ्या मेळाव्याच्या रोमांचक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. (first dasara melava of shivsena Balasaheb thackeray organized on shivaji park read interesting story)

  • ५६ वर्षांपूर्वी ३० ऑक्टोबर १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानात पहिला दसरा मेळावाचे आयोजन केले होते. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर म्हणजेच चार महिन्यांनी हा मेळावा होता त्यामुळे शिवसेनेसाठी हा नेहमीच खुप खास आणि जिव्हाळ्याचा विषय राहलाय.

  • १९६६ साली दसरा हा २३ ऑक्टोबरला आला होता. मात्र काही कारणास्तव त्या दिवशी शिवसेनेला हा दसरा मेळावा साजरा करता आला नाही. त्यामुळे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा सात दिवसांनी उशीरा म्हणजेच ३० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला.

  • हा दसरा मेळावा प्रत्येकासाठी नवीन होता. त्यामुळे दसरा मेळावा कसा होणार, कुठे होणार, यासाठी प्रत्येकाला उत्सूकता होती. त्यावेळी शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची जाहिरात प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'मार्मिक' या नियतकालिकामधून काढण्यात आली आणि शिवाजी पार्कवर लोकांना एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरामेळाव्याला साधा पँट-शर्ट परिधान केला होता. शिवाजी पार्कच्या मैदानावर त्यादिवशी अपेक्षेपेक्षा प्रचंड मोठी गर्दी जमली होती.

  • शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात लोकांकडून स्टीलच्या डब्ब्यातून वर्गणी जमवली होती. दसरा मेळाव्यादरम्यान लोकांच्या गर्दीत एक स्टीलचा डब्बा फिरवण्यात आला होता. त्यात लोक त्यांच्या मनाप्रमाणे वर्गणी देत होते.

  • या दसरा मेळाव्याला बंदोबस्तीसाठी कोणतेही पोलिस नव्हते तर चक्क पैलवान सुरक्षेसाठी होते.

  • दसरा मेळाव्यापूर्वी बाळासाहेबांनी मुंबईत अनेक ठिकाणी बैठकी घेतल्या होत्या. अगदी छोटीशी चाळ असो की व्यायामशाळा त्यांनी ठिकठिकाणी बैठकी घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT