First ST Bus  Sakal
महाराष्ट्र बातम्या

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

लोकांनी सोशल मीडियावर फोटो टाकले असून आपल्या आठवणी जागवल्या आहेत.

वैष्णवी कारंजकर

आज १ जून आजच्याच दिवशी १९४८ साली राज्य परिवहन मंडळाची पहिली गाडी अर्थात पहिली लालपरी धावली. या लालपरीचा मार्ग पुणे नगर असा होता. या घटनेला आता ७३ वर्षे पूर्ण झाली आहे. लोकांनी सोशल मीडियावर फोटो टाकले असून आपल्या आठवणी जागवल्या आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. या एसटीचा पहिला थांबा शिरूर होता. शिरुरमधल्याच दत्तोबा पवार यांनी ही पहिली बस चालवली होती. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. आजही शिरुरमध्ये एसटीमध्ये काम केलेले काही जुने कर्मचारी आहेत.

कशी होती पहिली बस?

पुणे - अहमदनगर या मार्गावर राज्यातली पहिली एसटी धावली. लाकडी बॉडी आणि बाजूने कापडी कव्हर या एसटीला लावण्यात आलं होतं. त्यानंतर भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना झाली. मुंबई , मध्यप्रांत आणि निझाम राज्याचा भाग असं मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या भागातल्या वाहतूक सेवा आणि राज्यातली सेवा, हे सगळं एकत्र करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली.

मुंबईत या महामंडळाची तीन आगारे आहेत - मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला. कुर्ला हे आगार इतर दोघांच्या तुलनेत मोठं आहे. पण मुंबई सेंट्रल हे डेपो असलेलं आगार सगळ्यात मोठं मानलं जातं. हा डेपो सर्वात जुना आणि पहिला डेपो मानला जातो. पश्चिम रेल्वे स्टेशन समोरचा हा डेपो म्हणजेच महामंडळाचं मुख्यालय होय.

हळूहळू बसेसची संख्या वाढू लागली. त्यामुळे नंतर परेल (६०च्या दरम्यान) आणि कुर्ला डेपोची निर्मिती झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Update: माेठी बातमी! एक लाख ७२ हजार शेतकरी राहणार वंचित; पीएम किसान सन्मान निधी योजना, नेमकं काय कारण?

Gold Silver Investment News : १५ दिवसांत सोने २४ हजार तर चांदी १ लाख ४० हजारांनी उतरले; शेअर बाजारात मोठी उलाढाल शक्य

Latest Marathi News Live Update : भारत 'अत्यंत यशस्वी' उदयोन्मुख अर्थव्यवस्था- अँटोनियो गुटेरेस

Saket Srinivasayya Death : कॅलिफोर्नियात सहा दिवसांपासून बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला, तपास सुरू, संशयास्पद मृत्यू

बॉलिवूडमध्ये साध्या घरगुती आहाराची क्रेझ; फिट राहण्यासाठी अभिनेत्रींचा मराठमोळ्या पदार्थांकडे कल

SCROLL FOR NEXT