महाराष्ट्र बातम्या

'पूरस्थिती लक्षात घेऊन समुद्र किनारी बांधणार संरक्षण भिंत'

राज्याच्या अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणावर तडाखा बसला आहे.

राजेश कळंबटे/

मुंबई : ज्या गावांना समुद्राचा धोका आहे. पावसाळ्यात अथवा भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावात आणि वाड्या-वस्त्यांमध्ये येऊ नये. यासाठी ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 78.25 किलोमीटर भिंत बांधावी लागेल. त्यासाठी 694 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्याच्या अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणावर तडाखा बसला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान तर झालंच आहे. मात्र अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामुळे राज्यसरकार आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात काही निर्णय घेत आहे.

समुद्रकिनारी असणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहेत. केरळ राज्यात अशाप्रकारे निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धरतीवर राज्यसरकार हा निर्णय घेत आहे. समुद्रकिनारा लाभलेल्या जिल्ह्यांपैकी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. संपूर्ण किनारपट्टीला संरक्षण भिंत बांधणं शक्य नाही. त्यामुळे ज्या गावांना समुद्राचा धोका आहे. पावसाळ्यात अथवा भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी गावात आणि वाड्या-वस्त्यांमध्ये येऊ नये. यासाठी ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे.

शेतजमिनीत समुद्राचं पाणी आल्यानंतर शेतजमीनिवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. त्यासाठी जवळपास एक हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पाचही जिल्ह्यातील माहिती घेण्यात आली असून येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यात किती किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे आणि त्याचा अपेक्षित खर्च आहे.

ठाणे

ठाणे जिल्ह्यासाठी 2.50 किलोमीटरची भिंत बांधावी लागेल त्यासाठी 50 कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च आहे.

पालघर

पालघर जिल्ह्यात 7.31 किलोमीटर भिंत बांधावी लागेल. त्यासाठी 103 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

रायगड

रायगड जिल्ह्यात 22 .97 किलोमीटरची संरक्षण भिंत बांधावी लागेल त्यासाठी 349 कोटी खर्च अपेक्षित आहे.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 60 किलोमीटर ची भिंत बांधावी लागेल. त्यासाठी 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात 78.25 किलोमीटर भिंत बांधावी लागेल. त्यासाठी 694 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या पाचही जिल्ह्यात एकूण 171 किलोमीटरची संरक्षण भिंत बांधावी लागेल. त्यासाठी 1600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोकणातील दुर्घटना आणि नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी निर्णयामधील राज्य सरकारचा हा एक प्रयत्न आहे. केरळ सरकारने अशाच पद्धतीने निर्णय घेऊन संरक्षण भिंत बांधली आहे. त्याच धरतीवर राज्य सरकार हा निर्णय घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मंडणगड साईनगर येथे ‘नाना - नानी पार्क’चे लोकार्पण

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

SCROLL FOR NEXT