former CM vasantrao naik
former CM vasantrao naik  
महाराष्ट्र

Agriculture Day : भूमिहिनांना एक लाख एकर जमीन वाटणाऱ्या मुख्यमंत्र्यांने महाराष्ट्रात हरितक्रांती घडवली...

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री पदाची चलबिचल खुर्ची सलग ११ वर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवून महाराष्ट्रात हरित क्रांती घडवणाऱ्या मुख्यमंत्र्याची ही गोष्ट...

महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो. वसंतरावाच नेमकं काम कसं होत हेच आपण आज या लेखातून जाणुन घेणार आहोत..

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं जितकं अवघड आहे त्याच्या कैकपटीनं ती टिकवून ठेवणं अवघड. प्रत्येकालाच हे सत्तासूत्र जमेलच असं नाही. स्वतः शरद पवारांना सुद्धा मुख्यमंत्रिपद सलग पाच वर्षे स्वतः जवळ ठेवता आलं नाही. अशी मुख्यमंत्री पदाची चलबिचल खुर्ची सलग ११ वर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवून महाराष्ट्रात हरित क्रांती घडवणाऱ्या मुख्यमंत्र्याची ही गोष्ट.

वसंतराव नाईक यांचा जन्‍म बंजारा समाजामध्‍ये सौ. होनुबाई फुलसिंग नाईक यांच्‍या पोटी दि. १ जुलै १९१३ रोजी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) या गावी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी गहुली हे गाव वसविले. चतुरसिंग हे तांड्याचे प्रमुख होते. म्‍हणून त्‍यांना लोक नाईक म्‍हणत.

वसंतरावाचे बालपण गहुली गावीच गेले. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादवी, उमरी, भोजला, बान्‍सी या ठिकाणी झाले. त्‍या काळी वाहनांची सोय नसल्‍यामुळे ते चार-पाच मैल चालत जाऊन मोठ्या जिद्दीने व कष्‍टाने शिक्षण घेतले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले. तत्‍कालीन नागपूर जुन्‍या मध्‍यप्रदेशाची राजधानी होती. नागपूर शहराचे प्रभाव वसंतरावांच्‍या जिवनात फार महत्‍त्‍वाचे ठरले. तेथे त्‍यांच्‍यात अमुलाग्र बदल होत गेला. ते पुस्तके वाचु लागले ,यातुनच वसंतराव नाईकांवर महात्मा फुलेंचा आणि डेल कार्निगींचा प्रभाव होऊ लागला.

पुढे त्यांनी नागपुरात महाविद्यालयीन वयातच त्यांनी वत्सलाबाईंशी आंतरजातीय विवाह करुन आपला संसार थाटला. त्यांना अरुंधती, अविनाश, निरंजन ही तीन मुलं झाली. वसंतराव नाईकांनी १९४१ ला चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांचा गांधीजींसोबत जवळचा संबंध आला. कॉंग्रेसच्या विचारधारेने ते अगदी भारावून गेले. आणि त्यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

पहिल्याच विधानसभा निवडणुकीत आमदार

लोकसंपर्क दांडगा असल्यामुळं त्यांच्यावर कॉंग्रेसच्या पुसद तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यावेळी त्यांनी अनेक गावांत रस्ते तयार करण्याच काम हाती घेतलं. १९४६ च्या पुसद नगरपालिकेच्या ते नगराध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी बापू बालक मंदिर शाळा उभारून सर्वसामान्याच्या लेकराबाळापर्यंत शिक्षण पोहवण्याच काम केल.

पुढे त्यांनी ग्रेन मार्केटच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना पैसा मिळवून दिला.त्यामुळे यवतमाळच्या प्रत्येक गावोगावी वसंतरावांचं नाव आणि त्यांच पारदर्शक काम दोन्ही पोहचलं. पुढे ते १९५२ च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आणि जिंकून येऊन आमदार देखील झाले, त्यावेळी यवतमाळ मध्यप्रदेश राज्याचा भाग होता. पुढे १९५७ ते १९६० पर्यंत वसंतरावांनी कृषिमंत्री म्हणून काम केले. त्यांची काम करण्याची पद्धत जनसामान्यांना इतकी भावली की काही दिवसातच लोकांनी वसंतराव नाईकांना कृषिविकास पुरुष ही नविन ओळख बहाल केली.

१ लाख ३७ एकर शेती भूमिहिनांना देणारे वसंतराव नाईक..

कृषिमंत्री पदाचा कारभार सांभाळल्यानंतर वसंतरावांनी आयुष्यात मागं वळून पाहिलं नाही. वसंतरावांना आसमान कवेत होतं पण त्यांनी जमीन सोडली नाही. ते परत जमिनीकडे परतले फक्त आपल्या मातीतल्या माणसांसाठी. वसंतरावांनी आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत मोलाचा सहभाग नोंदवून , यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ३७ एकर शेती ही भूमिहिनांना मिळवून दिली. राज्यात पंचायत राज कायद्याची राज्यात मुहूर्तमेढ रोवली, आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. प्रत्येकाला सत्तेत सामील होता यावं आणि हित साधता यावं अशी त्यांची प्रबळ इच्छा होती.

१९७२ च्या दुष्काळावर वसंतरावांनी कशी मात केली ?

चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका या देशांचे दौरे करून वसंतराव नाईकांनी शेतीपिकांच्या संकरित वाणांची महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ओळख करून दिली. शेतकरी नगदी पिकं पिकवू लागले. ऊस आणि कापसाचे जसे उत्पन्न वाढले तसे महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणायला त्यांनी सुरुवात केली. नगदी पिकं पिकू लागली आणि कारखान्यांकडून तो माल खरेदी होऊ लागला आणि शेतकऱ्यांच्या हातात मुबलक पैसा आला तो वसंतराव नाईकांमुळच. १९७२ च्या दुष्काळानंतर सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही. अशा परिस्थितीत नागरिकांसमोर अन्नधान्याचं मोठं संकट उभं राहिलं तेव्हा वसंतरावांनी देशातली पहिली रोजगार हमी योजना सुरू करण्याचं धाडसं केलं; ती यशस्वीपण राबवलीदेखील. त्यांच्या या निर्णयामुळं सात हजारांवर विहिरी, मध्यम धरणे, छोटे कालवे खोदण्याचं काम केलं आणि ५० लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT