Param Bir Singh esakal
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंहांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी..

सकाळ डिजिटल टीम

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खळबळजनक उत्तरं सीबीआय चौकशीत दिली आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) दिलेल्या चौकशीत महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिवाय, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसमधील निलंबित अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze) पुन्हा सेवेत घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला होता, असं त्यांनी खळबळजनक उत्तरं सीबीआय चौकशीत दिलीय.

CBI नं 100 कोटी वसुलीप्ररकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला आता परमबीर सिंह यांचा जबाबही जोडण्यात आलेला आहे. तर, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याप्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर करण्यात आलाय. केवळ मुख्यमंत्रीच नाही, तर शरद पवार यांनाही याबाबत सांगितल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलंय. त्यामुळं एकच खळबळ उडालीय.

शिवाय त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब आणि जयंत पाटील यांनाही देशमुखांच्या कृत्याबाबत माहिती दिल्याचं सिंह यांनी जबाबात म्हटलंय. वाझेला पुन्हा पोलीस दलात का नियुक्त करण्यात आलं, अता प्रश्न सीबीआय चौकशीत परमबीर सिंह यांना विचारण्यात आलेला होता. त्याला उत्तर देताना परमबीर सिंह यांनी म्हटलंय, की पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक सुरा चौहान यांनी भेट घेतली होती. वाझे याला पुन्हा नियुक्त करण्यातासाठी दबाव टाकला होता. मी याबाबत खुद्द आदित्य ठाकरेंशीही बोललो होतो. तर त्यांनी मला याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायचा सांगितलं. पण, त्यांनी आणि देशमुखांनी वाझेला पुन्हा सेवेस सामावून घेण्यासाठी दबाव टाकला होता.

शरद पवारांसह अजित पवार, अनिल परब, जयंत पाटील यांनी मी देशमुखांच्या कृत्यांबाबत कल्पना दिली होती. पण मी मुख्यमंत्री, पवार आणि इतर मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे गैरप्रकाराची माहिती दिली म्हणून त्यांनी माझ्यावर सूड उगवला, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT