महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख गायब असल्याच्या चर्चा रंगताच 'तो' VIDEO व्हायरल

अनिल देशमुख गायब असल्याच्या चर्चा रंगताच 'तो' VIDEO झाला व्हायरल माजी गृहमंत्री अनिल देशमुख रविवारपासून 'नॉट रिचेबल' असल्याची चर्चा Former Maharashtra home minister Anil Deshmukh underground Gossip ED searching Video goes Viral vjb 91

विराज भागवत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख रविवारपासून 'नॉट रिचेबल' असल्याची चर्चा

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या १०० कोटींच्या खंडणी वसुली (100 Crores Extortion Case) प्रकरणात ईडीच्या (Enforcement Directorate) रडारवर आहेत. ईडीने (ED) त्यांना आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी (Summons) बोलावले होते. पण तीनही वेळा ते विविध कारणांमुळे हजर राहिले नाहीत. त्यानंतर ईडीने नुकतेच त्यांची ४ कोटींहून अधिकची स्थावर मालमत्ता (Property Seized) जप्त केली. या घटनेनंतर काही तासांतच अनिल देशमुख हे भूमिगत (Underground) झाले असून ईडीची पथके त्यांचा शोध घेत असल्याचे वृत्त टीओआयने दिले. मात्र आता अनिल देशमुखांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Former Maharashtra home minister Anil Deshmukh underground Gossip ED searching Video goes Viral vjb 91)

याचदम्यान, अनिल देशमुख यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनिल देशमुख काही गोष्टींचे स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. "ईडीने ईडीने माझा कुटुंबाची 4 कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या कारवाईत माझा मुलगा सलील देशमुख याची 2.67 कोटीची जमीन 2006 साली घेतली होती. ही जमिन 300 कोटींची असल्याच्या काही माध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या आहेत. यातून गैरसमज पसरवला जात आहे. मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्नीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल, त्यानंतर मी स्वत: ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे", अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, ईडीने रविवारी अनिल देशमुख यांच्या शोधासाठी काही पथके पाठवली होती. नागपूरजवळच्या अनेक विभागात त्यांनी देशमुखांचा शोध घेतला. अनिल देशमुख ज्या ज्या ठिकाणी जाऊन राहू शकतात अशा ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास केला. रविवारच्या शोधमोहिमे अंतर्गत देशमुखांच्या काटोल येथील वडिलोपार्जित घरी त्यांचा शोध घेण्यात आला. तसेच, काही संशयास्पद ठिकाणीदेखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहिम हाती घेतली. तीन वेळा समन्स बजावूनही देशमुख ईडी चौकशीला गैरहजर राहिले. त्यानंतर ते गायब असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने त्यांना शोधणे अधिकच कठीण जात असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT