महाराष्ट्र बातम्या

Breaking : धुळ्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड

सकाळवृत्तसेवा

पुणे : धुळे जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे पुण्यात आकस्मिक निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुणे येथेच १० मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

माजी आमदार धरमचंद चोरडिया हे १९७७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. १९७८-८१ या काळात ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होती. १९८२ साली ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय चिटणीस झाले. त्याकाळात त्यांनी राष्ट्रीयस्तरावर केलेल्या कामाची दखल घेत त्यांना भाजपात प्रदेश चिटणीसपद मिळाले. त्यानंतर ते प्रदेश संघटनमंत्री होते.

धरमचंद चोरडिया १९८४ ते ९० याकाळात धुळे पालिकेचे सदस्य होते. त्यानंतर ते १९९२ साली जूनमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने कारावास भोगला होता. तसेच मराठवाडा नामांतर आंदोलनातही कारावास भोगला होता. ते जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदावरही होते.

विधान परिषदेचे आमदार असतांना १९९२ मध्येच त्यांचा जोधपूर येथे कौटुंबिक कार्यक्रमास गेले असतांना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून लांब गेले होते. धुळ्यात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह जे नेते आले त्यांनी धरमचंद चोरडिया यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT