Land Acquisition

 

Sakal

महाराष्ट्र बातम्या

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

मूळ मालकाच्या परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून, खोटा सर्व्हे नंबर बनवून आणि कब्जा पावती व नोटरी बनावट करून जागा-जमिनीची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकांनी खरेदी घेणाऱ्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढावा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही, असे प्रांताधिकारी सांगतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मूळ मालकाच्या परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून, खोटा सर्व्हे नंबर बनवून आणि कब्जा पावती व नोटरी बनावट करून जागा-जमिनीची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोलापूर शहरातील सदर बझार, एमआयडीसी व विजापूर नाका या तीन पोलिस ठाण्याअंतर्गत अशा तक्रारी खूप आहेत. मात्र, फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकांनी खरेदी घेणाऱ्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट काढावा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही, असे प्रांताधिकारी सांगतात.

स्वत:च्या मालकीच्या मालमत्तेवर बॅंकांकडून अनेकजण कर्ज घेतात. त्यावेळी त्या प्रॉपर्टीवर संबंधित बॅंकेच्या बोजाची नोंद होते. प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवेळी तो बोजा भरून बेबाकी दाखला घ्यावाच लागतो. मात्र, अलीकडे कर्ज न भरताच कोणताही दाखला न घेता प्रॉपर्टी विकली जाते. त्यानंतर बॅंक मूळ मालक व नव्या मालकाला नोटीस बजावून कर्जाची रक्कम वसूल करू शकते.

दरम्यान, सोलापूर शहरात एखाद्या ठिकाणी जागा नसताना देखील बनावट सर्व्हे नंबर तयार करून दुसऱ्याचीच प्रॉपर्टी आपली दाखवून त्याचा व्यवहार केला जातो. याशिवाय मूळ मालकाच्या परस्पर जागांची विक्री केली जाते. कब्जा नसताना बनावट कब्जा पावती दाखवून जागा विकण्याचेही प्रकार सुरु आहेत. अशावेळी सर्च रिपोर्ट काढूनच त्या मालमत्तेची खरेदी घ्यावी, अन्यथा फसवणूक होऊ शकते, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

सर्च रिपोर्टमधून टायटल क्लेअर असल्याचे समजते

जमीन, जागेची खरेदी घेणाऱ्याची अनेकदा खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक होते. पण, खरेदी-विक्रीवेळी फसवणूक होऊ नये यासाठी त्या मालमत्तेचा ‘सर्च रिपोर्ट’ काढणे आवश्यक आहे. त्यातून आपण घेणाऱ्या प्रॉपर्टीचा संपूर्ण इतिहास समजतो आणि फसवणूक टळते.

- सदाशिव पडदुणे, प्रांताधिकारी, सोलापूर

खरेदीवेळी होते अशी फसवणूक....

  • १) मूळ मालक किंवा उताऱ्यावरील हिस्सेदार खरेदीदस्तावेळी उपस्थित नसताना बनावट व्यक्ती उभा केला जातो. त्यावेळी ओळखणारे साक्षीदार देखील पैसे देऊन उभा केलेले असतात.

  • २) विकलेल्या मालमत्तेची नोंद सहा महिने, वर्षभर न लावता किंवा अडचणीमुळे नोंद लागली नसल्यास त्या काळात ती प्रॉपर्टी दुसऱ्याला विकली जाते.

  • ३) न्यायालयात दावा दाखल असतो. कोर्टाच्या निकालानुसार वाटप दाव्यानुसार ती प्रॉपर्टी सर्वांना समान प्रमाणात मिळते. तत्पूर्वी, मूळ प्रॉपर्टीतील आपल्या हिश्श्याची जागा- जमीन विकली जाते.

  • ४) बॅंकेचा सातबारा उताऱ्यावर बोजा असतो, त्यावेळी कर्ज भरून बेबाकी दाखला खरेदीदस्ताला जोडून मालमत्तेची विक्री करावी लागते. पण, बनावट दाखला जोडून कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मक्का मदिनाजवळ भीषण अपघात! ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू; डिझेल टँकरला बस धडकली अन्...

आता प्रादेशिक सैन्यातही महिलांना संधी मिळणार, भारतीय लष्कराचा प्रायोगिक तत्वावर विचार

Dombivli Politics: टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल; 'स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नकोच'!

Latest Marathi Breaking News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जाणार

Stock Market Today : शेअर बाजाची हिरव्या रंगात सुरुवात; सेन्सेक्स 240 अंकांनी वाढला; तर निफ्टी बँकने उच्चांक गाठला!

SCROLL FOR NEXT